मुंबईकरांनो सावधान ! आला धक्कादायक अहवाल, मुंबईत 'एका' आजाराचं प्रमाण वाढतंय

मुंबईकरांनो सावधान ! आला धक्कादायक अहवाल, मुंबईत 'एका' आजाराचं प्रमाण वाढतंय

मुंबई, ता. 8 : मुंबईतील गोंगाट म्हणजेच ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण वाढत असून बहिरेपणा येण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. आजाव फाउंडेशनच्या अभ्यासात हा निष्कर्ष काढण्यात आला असून यासाठी जबाबदार बाबींवर कारवाई करत आवश्यक ती पावलं उचलण्याची मागणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे  केली आहे. 

आवाज फाउंडेशन ध्वनी प्रदूषणावर 2002 पासून काम करत आहे. मुंबईतील ध्वनी प्रदूषण, त्याची कारणे, त्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यांचा अभ्यास करण्यात आला आहे. ध्वनी प्रदूषणाचा ऐकण्याच्या क्षमतेवर कसा व किती परिणाम होती याचा अभ्यास देखील करण्यात आला आहे. यासाठी ध्वनी प्रदूषणामध्ये राहणाऱ्या काही पोलिस कर्मचारी तसेच चाळींमध्ये राहणाऱ्या काही लहान मुलांच्या ऐकण्याच्या क्षमतेची चाचणी करून अभ्यास करण्यात आला. 

लॉकडाऊनच्याआधी ध्वनी प्रदूषण ही गंभीर समस्या म्हणून जगा समोर आली होती. ध्वनी प्रदूषणामुळे अनेक लोकांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला असून याची त्यांना कल्पना ही नसल्याचे अभ्यासात समोर आले आहे. मुंबई हे देशातील सर्वाधिक ध्वनी प्रदूषित असणारे शहर तर भारत हा जगातील सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे.

वाहतूक कोंडी, बांधकाम, विमानतळ आणि रेल्वेमुळे ध्वनीप्रदूषण वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. आवाज फाउंडेशनने विविध ध्वनी प्रदूषणाची जबाबदार ठरणाऱ्या माध्यमांचा गेल्या दोन दशकांपासून अभ्यास सुरू केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलिस विभाग तसेच राज्य सरकारने लोकांच्या सहकार्याने काही महत्वाची पावलं उचलून ध्वनी प्रदूषण काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे ही आवाज फाउंडेशन ने म्हटले आहे. मात्र आज ही ध्वनी प्रदूषण ही गंभीर समस्या कायम असल्याचे ही त्यांनी पुढे म्हटले आहे. 

ध्वनी प्रदूषणाचा आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत आहे. उच्च रक्तदाब, हृदयासंबंधी आजार, मानसिक आरोग्य तसेच कर्करोगासारखे आजार बळावण्याची शक्यता असल्याचे ही आवाज फाउंडेशन ने म्हटले आहे. ध्वनी प्रदूषणाचा केवळ माणसांच्या आरोग्यावरच नाही तर प्राण्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. प्रदूषण आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध यावेळी कोरोना महामारीमुळे अधोरेखित झाला. मात्र प्रदूषणामुळे पसरलेला कोरोना संसर्ग हा एकमेव चिंतेचा विषय नसून ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून मुंबई सारख्या शहरात ही समस्या अनेक दशकांपासून भेडसावत असल्याचेही आवाज फाउंडेशनने म्हटले आहे. 

ध्वनी प्रदूषणाच्या समस्येबाबत जागतिक आरोग्य संघटनेने एक अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार जगभरात  2050 पर्यंत 2.5 लोकांना ऐकण्याची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. यातील अधिकतर लोकसंख्या ही भारतातील असल्याचे ही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार मुंबई हे देशातील सर्वाधिक ध्वनी प्रदूषण असणारे शहर असल्याचे ही नमूद करण्यात आले आहे.
 
ध्वनी प्रदूषणा विरोधात सरकारने गांभीर्याने पावलं उचलणे गरजेचे आहे. ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेला ऑडिओमेट्री ऍप सर्वादामान्यांसाठी उपलब्ध करून देऊन लोकांना ध्वनी प्रदूषणाबाबत जागरूक करणे तसेच प्रदूषण कमी करण्यास हातभार लावणे गरजेचे असल्याचे आवाज फाउंडेशनच्या  सुमायरा अब्दुल अली यांनी सांगितले. 

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने विकसीत केलेले ऍप सुरू करणे गरजेजे आहे. यामुळे लोकांमध्ये ध्वनी प्रदूषणाबाबत जागृती येईल तसेच ते आपल्या आरोग्य समस्यांबाबत सजग राहतील असे ही आवाज फाउंडेशन च्या सुमायरा अब्दुल अली यांनी सांगितले.

mumbai news increased noise pollution is affecting on the the health of citizens of mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com