आता थेट दाखल होणार FIR; पुन्हा डोकं वर काढणारा कोरोना आणि नियंत्रणासाठीचा मेगाप्लान वाचा

आता थेट दाखल होणार FIR; पुन्हा डोकं वर काढणारा कोरोना आणि नियंत्रणासाठीचा मेगाप्लान वाचा

मुंबई : गेल्या काही दिवसात मुंबईत कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या मुंबईतील लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु केल्यानंतर पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळतेय. १ फेब्रुवारीला मुंबईची लोकल सुरु झाली. त्यानंतर मुंबईतील कोरोनाची आकडेवारी पुन्हा वाढू लागली. या पार्श्वभूमीवर आता  मुंबईची लाईफ लाईन मुंबई लोकल पुन्हा बंद होईल की काय अशी भीती मुंबईकर व्यक्त करतायत.

कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर कठोर निर्णय घ्यावे लागतील. पुन्हा लॉकडाऊन करायला लागेल असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मुंबईतील लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. वाढत्या गर्दीचा आणि कोरोनाचे नियम न पाळण्याचा मुंबईकरांना मोठा फटका बसू शकतो असं अजित पवार म्हणालेत. 

अशात मुंबईतील कोरोनाचा आकडा पुन्हा एकदा कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने मेगाप्लॅन आखला आहे. काल मुंबईत ७२१ नवीन रुग्ण आढळून आले होते. आज मुंबईचे महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी मुंबईतील सर्व वॉर्ड ऑफिसर्स, अतिरिक्त आयुक्त आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाची बैठक घेतली. या बैठकीच्या माध्यमातून आयुक्तांनी महत्त्वाच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. 

काय आहे मुंबईसाठीचा मेगाप्लान  

आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या सूचनांनुसार मुंबईतील प्रत्येक वॉर्डमधील चार लग्न कार्यालये, चार रेस्टॉरंट्स आणि १ नाईट क्लब यांची तपासणी केली जावी आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे इथून पुढे प्रत्येक वॉर्डमधील चार लग्न कार्यालयं तपासली जातील. त्या कार्यालयात सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन होतंय की नाही, वऱ्हाडींच्या तोंडावर मास्क आहे की नाही हे तपासलं जाणार आहे. 

सोबतच मुंबईतील रेस्टॉरंट्स आणि नाईट क्लबची देखील तपासणी केली जाणार आहे. तिथे कोरोना नित्यमचे पालन केलं जातंय का ? हॉटेलमधील किचनमध्ये नियमांचे पालन होतंय का यावरही महापालिकेची नजर असणार आहे. 

लोकलमध्ये विशेष मार्शल्स : 

गेल्या काही दिवसात मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे प्रमुख कारण म्हणजे मुंबईतील सुरु झालेली लोकल. अशात मुंबई लोकलमध्ये नागरिक कोरोना नियम पायदळी तुडवत असल्याचं पाहायला मिळालं. म्हणूनच मुबईतील लोकलच्या तीनही लाईनवर तब्बल ३०० मार्शल्स नियुक्त केले गेले आहेत. 

आता थेट FIR नोंदवली जाणार 

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हाय रिस्कमधील नागरिक किंवा ज्यांना घरी क्वारंटाईन राहण्याच्या सूचना आहेत असे नागरिक घरात आढळून आले नाहीत किंवा बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर थेट FIR दाखल करण्यात येणार आहे. 

मुंबईतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता मुंबईत कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिलेल्या आहेत. 

mumbai news increasing number of corona and megaplan of BMC to reduce covid patient count

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com