esakal | मनसुख हिरेन यांची स्कॉर्पियो कार वापरण्याच्या प्रश्नावर सचिन वाझे म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

मनसुख हिरेन यांची स्कॉर्पियो कार वापरण्याच्या प्रश्नावर सचिन वाझे म्हणाले...

या इनोव्हाचे शेवटचे लोकेशन ठाणे होते.

मनसुख हिरेन यांची स्कॉर्पियो कार वापरण्याच्या प्रश्नावर सचिन वाझे म्हणाले...

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई : ठाण्यातील उद्योजक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे.  या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप होत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांचे तात्काळ निलंबन करुन अटकेची मागणी केली आहे. मागच्या महिन्यात उद्योगुपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो गाडी सोडण्यात आली होती. त्यावेळी एसयूव्हीसोबत एक इनोव्हा कारही होती. ही इनोव्हा कार पोलिसांनी शोधून काढली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. अँटिलिया जवळ स्कॉर्पियो पार्क केल्यानंतर त्या कारचा ड्रायव्हर इनोव्हामधून निघून गेला. या इनोव्हाचे शेवटचे लोकेशन ठाणे होते. या इनोव्हाचा शोध लागल्यामुळे या प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागू शकतात असे सूत्रांनी सांगितले. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाची बातमी : स्फोटकांनी सापडलेल्या स्कॉर्पियोचा फॉरेन्सिक अहवाल समोर, आली धक्कादायक माहिती समोर

"या प्रकरणात तपास सुरु आहे. त्यामुळे कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही, कारण त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो" असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाची सुई सचिन वाझे यांच्यावर असून बुधवारी माध्यमांनी त्यांना गाठले. पण त्यावेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 

नोव्हेंबर महिन्यापासून आपण मनसुख हिरेन यांची स्कॉर्पियो कार वापरलेली नाही असे सचिन वाझे यांनी एटीएसच्या चौकशीत सांगितले. हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी एटीएसला दिलेल्या जबानीत सचिन वाझे आपल्या नवऱ्याची स्कॉर्पियो कार वापरत होते, असे सांगितले. सचिन वाझे आणि मनसुख हिरेन परस्परांना ओळखत होते. पोलीस दलातील अनेक अधिकारी हिरेन यांना ओळखत होते, असे वाझेंनी एटीएस अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. विमला यांनी सचिन वझे यांच्यावर नवऱ्याची हत्या केल्याचा आरोप केला आहे. 

Mansukh hiran death case sachin vaze denies he had been using hirans scorpio

loading image