'मराठी भाषा भवना'वर उपकेंद्रांचा उतारा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

मुंबई - मराठी भाषा भवनाची घोषणा 2013 मध्ये तत्कालीन सरकारने केली. त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली. मात्र, 2018 उजाडले तरीही भवनाच्या उभारणीला मुहूर्त मिळालेला नाही. भवनाच्या निर्मितीसाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे; मात्र मूळ भाषा भवनाला होणाऱ्या विलंबामुळे आता ऐरोली येथे उपभाषा भवन उभारले जाणार आहे.

मराठी भाषेची समृद्धीच्या दिशेने वाटचाल व्हावी, प्रशासकीय कामांत समन्वय राहावा, यासाठी मराठी भाषा विभागाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, संशोधनाची कामे, मराठी भाषा प्रशिक्षण संस्था, प्रशिक्षणार्थींसाठी वसतिगृहे, पुस्तक विक्री केंद्र अशा विविध प्रकारचे उपक्रम मराठी भाषा भवन उभारून राबवले जाणार होते. मात्र, पाच वर्षे उलटूनही कधी सातबाऱ्यावर नावाला विलंब, पुरातत्त्व समितीचा विरोध, नगरविकास खात्याच्या उत्तराची प्रतीक्षा; तर कधी जागेसाठी शोधाशोध अशा विविध कारणांमुळे मराठी भाषा भवनाची उभारणी झाली नाही. हा प्रस्ताव केवळ फायलींमध्येच अडकून राहिला. यातील अडचणींचा डोंगर लक्षात घेऊनच मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्राची संकल्पना पुढे आली. ऐरोली सेक्‍टर- 12 येथे हे उपकेंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी तीन कोटींचा निधी खर्च करून सिडकोकडून भाडेतत्त्वावर जागा घेण्यात आली आहे.

Web Title: mumbai news marathi bhasha bhavan sub center