"अभिजात मराठी'साठी मुंबईत स्वाक्षरी मोहीम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

मुंबई - मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचे घोंगडे केंद्र सरकारकडे भिजत पडले आहे. कोकण मराठी साहित्य परिषदे (कोमसाप)च्या वतीने या विलंबाच्या निषेधार्थ बुधवारी (ता. 24) सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. 

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी सर्व स्तरांमधून प्रयत्न सुरू आहेत. स्वाक्षरी मोहिमेसह भाषामंत्री विनोद तावडे यांच्यापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींपर्यंत सर्वांनी यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले जात आहे. त्याला राजकीय पुढाऱ्यांनीही अनुकूलता दर्शवली आहे. मात्र, या संदर्भातचा प्रस्ताव अद्याप केंद्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर झालेला नाही. या फाइलला गती मिळावी, यासाठी "कोमसाप'च्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे. 

Web Title: mumbai news marathi Signature campaign