ऑनलाईन पेंमेंटला अर्जदारांची पसंती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबई - म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे विविध ठिकाणच्या 819 घरांसाठी काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी अनामत रक्कम ऑनलाईन भरण्यास अर्जदार पसंती देत आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत सुमारे सहाशे अर्जदारांनी ऑनलाईन पेमेंट केले. अनामत रक्कम भरण्यासाठी म्हाडाने प्रथमच सुरू केलेल्या एनईएफटी/आरटीजीएस प्रणालीचा वापर केवळ एका अर्जदाराने केला आहे. 

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात 10 नोव्हेंबरला ही सोडत काढण्यात येणार आहे. शनिवारपासून (ता. 16) अर्जदारांची नोंदणी करण्यास सुरुवात झाली. केवळ दहा मिनिटांमध्ये 400 जणांनी नोंदणी केली होती. सोमवारी सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत आठ हजार 59 अर्जदारांनी नोंदणी केली; तर तीन हजार 211 अर्जदारांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी 594 अर्जदारांनी ऑनलाईन आणि एनईएफटी/आरटीजीएस प्रणालीचा वापर करून अनामत रक्कम जमा केली आहे. 593 अर्जदारांनी ऑनलाईन पेमेंट केले आहे. एकाही अर्जदाराने डीडीमार्फत अनामत रक्कम जमा केलेली नाही. अर्जदारांना 22 ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. 

Web Title: mumbai news mhada

टॅग्स