वस्तुसंग्रहालये सीसी टीव्हीच्या नजरेखाली

श्रद्धा पेडणेकर
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

मुंबई - सिंदखेड राजा येथील वस्तुसंग्रहालयातील तोफेची चोरी झाल्यानंतर सरकारला जाग आली आहे. राज्यातील वस्तुसंग्रहालयांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. 13 पैकी पाच वस्तुसंग्रहालयांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मुंबई - सिंदखेड राजा येथील वस्तुसंग्रहालयातील तोफेची चोरी झाल्यानंतर सरकारला जाग आली आहे. राज्यातील वस्तुसंग्रहालयांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. 13 पैकी पाच वस्तुसंग्रहालयांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दुर्मिळातील दुर्मिळ वस्तू आणि ऐतिहासिक वस्तूंचे जतन वस्तुसंग्रहालयांमध्ये केलेले असते. या वस्तू सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्ट्याही मौल्यवान असतात; मात्र अनेकदा या वस्तूंची चोरी होते किंवा त्या नष्ट करण्याचा प्रयत्न विध्वंसक वृत्तीचे लोक करीत असतात. राज्यातील वस्तुसंग्रहालयांमध्येही अत्यंत मौल्यवान वस्तू असून त्यांची सुरक्षा वाऱ्यावरच होती.

मॉं जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा येथील राजे लखुजीराव जाधव शासकीय वस्तुसंग्रहालयातून डिसेंबर 2014 मध्ये 85 किलो वजनाची पंचधातूची तोफ चोरीला गेली होती. आरोपी सापडले, परंतु यानिमित्ताने वस्तुसंग्रहालयांतील वस्तूंच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. "सकाळ'नेही या प्रश्‍नाकडे सुरक्षा यंत्रणांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सरकारने वस्तुसंग्रहालयांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची घोषणाही केली, परंतु तिच्या अंमलबजावणीसाठी 2017 उजाडले. पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच वस्तुसंग्रहालयांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे.

सिंदखेडराजा - साडेचार कोटी
पहिल्या टप्प्यात सिंदखेडराजा वस्तुसंग्रहालयासह औंध वस्तुसंग्रहालय, सेंट्रल म्युझियम (नागपूर) आणि कोल्हापूरच्या दोन वस्तुसंग्रहालयांत सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. सिंदखेडराजा वस्तुसंग्रहालयामध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी चार कोटी 35 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Web Title: mumbai news Museums under cctv camera

टॅग्स