BIG NEWS : उद्योजक आणि बॉलीवूड अभिनेता सचिन जोशीला ईडीकडून अटक

BIG NEWS : उद्योजक आणि बॉलीवूड अभिनेता सचिन जोशीला ईडीकडून अटक

मुंबई  : उद्योजक व बॉलीवूड अभिनेता सचिन जोशी याला सक्तवसूली संचलनालयाने( ईडी) रविवारी अटक केली. प्रसिद्ध ओमकार बिल्डर मनी लाँडरिंग प्रकरणात ही करावाई करण्यात आली आहे. 100 कोटी रुपयांच्या मनी लाँडरींगप्रकरणी सचिन जोशीचा सहभाग असल्याचा आरोप आहे.

ओमकार बिल्डर ग्रुप समुहाचे अध्यक्ष कमल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना 22 हजार कोटी रुपयांच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) फसवणूक प्रकरणात ईडीने नुकतीच अटक केली होती.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी येस बँकेकडून 450 कोटींच्या गुंतवणुकीसह अनेक बँकांकडून हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप ओमकार ग्रुपवर आहे. 2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात ओमकार ग्रुप आणि गोल्डन एज ग्रुप ऑफ कंपनीजच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात आरोप करण्यात आला होता की, या दोन कंपन्यांनी झोपडपट्टी वासीयांच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करुन मोठा गैरव्यवहार केला आहे. खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात ओमकार ग्रुप आणि गोल्डन एज ग्रुप ऑफ कंपनीजविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

ईडीने जानेवारी महिन्याच्या शेवटी मुंबईतील सुप्रसिद्ध विकासक ओमकार ग्रुपच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. बँकांकडून घेतलेले कर्ज आणि आर्थिक अनियमिततेच्या संशयावरुन ईडीने ही कारवाई केली होती. ईडीने आपल्या कारवाईत आतापर्यंत सायन येथील ओंकार बिल्डर कार्यालय, प्रभादेवी येथील ब्यूमोंटे अपार्टमेंट तसेच नेपियन्सी रोडवरील आशियाना बिल्डिंग येथील ओंकार ग्रुपच्या कार्यालयावर छापे टाकले होते.  ओमकार ग्रुपने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

सचिन जोशी हा गुटखा किंग व जेएमजे ग्रुपचे मालक जगदीश जोशी यांचा मुलगा आहे. याशिवाय सचिन जोशीने टॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये सिनेमांची निर्मिती केली आहे. सचिन जोशीने श्रीलंकेतील क्रिकेट लीगमध्ये टीम खरेदी केली होती. अजान, मुंबई मिरार, जॅकपॉट, वीरप्पन, अमावस यासारख्या हिंदी सिनेमात काम केले आहे. सचिन जोशी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या प्रकरणात अडकण्याची ही पहिली वेळ नाही.

या अगोदरही सचिनविरोधात अंधेरी येथील रहिवासी पराग संघवी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. संघवीला 58 कोटी रुपये रॉयल्टी न दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याशिवाय 30 माजी कर्मचार्‍यांचे वेतन न दिल्याचा आरोपही त्यांच्या कंपनीवर करण्यात आला होता. या व्यतिरिक्त ऑक्टोबर 2020 मध्ये ड्रग्स प्रकरणातही सचिन जोशीवर आरोप करण्यात आले होते.

याबाबत ईडी  संचालक एस के मिश्रा  यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सचिन जोशी च्या अटकेला दुजोरा दिला आहे.

mumbai news omkar builder money laundering bollywood actor sachin joshi arrested by ED

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com