अननसाला मागणी वाढली 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

नवी मुंबई, - पावसाळा सुरू झाल्याने घाऊक फळ बाजारात मोठ्या प्रमाणात अननस येत आहेत. त्यामुळे त्याचे दरही स्थिर आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात १०० ते १५० रुपये डझन या दराने अननस विकले जात आहेत. आजारी व्यक्तींसाठी त्याचा रस लाभदायक असल्याने त्याला बाजारात चांगली मागणी आहे. 

चवीला आंबट गोड असणारे अननस खास करून ज्यूस बनवण्यासाठी खरेदी केले जातात. पावसाळ्यात साथींचा फैलाव होत असल्याने आजारी व्यक्तीला ज्यूस देण्यासाठी अननस मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. केरळमधून सध्या मोठ्या प्रमाणात अननस बाजारात येत आहे.

Web Title: mumbai news Pineapple