खासदार मोहन डेलकर प्रकरण : आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

खासदार मोहन डेलकर प्रकरण : आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

मुंबई, ता.10: दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन देलकर यांच्या मृत्यू  प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. फेब्रुवारीमध्ये देलकर मुंबईतील हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडले होते.

डेलकर यांनी त्यांच्या लेटरहेडवर 15 पानांची सुसाईट नोट लिहिली होती. तपासणीतही ते डेलकर यांचेच हस्ताक्षर असल्याचे निष्पन्न झाले आहे. डेलकर यांच्या जवळच्या व्यक्तीने त्यांचे हस्ताक्षर ओळखले होते. पण हस्ताक्षर तज्ज्ञांच्या मदतीनेही पडताळणी करण्यात आली. त्यात सुसाईड नोटमधील हस्ताक्षर त्यांचेच असल्याचे निष्पन्न झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने देलकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यातही ती आत्महत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. अद्याप मुख्य अहवाल येणे बाकी आहे.  दरम्यान कुटुंबीयांच्या फिर्यादीनंतर याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत उच्च न्यायलयात एका खटल्या संदर्भात डेलकर मुंबईत आले होते. सकाळी अकराच्या सुमारास डेलकर यांचे चालक अशोक पटेलने त्यांना दूरध्वनी केला होता. पण त्यांनी तो उचलला नाही. वारंवार दूरध्वनी करूनही डेलकर  प्रतिसाद देत नसल्यामुळे चालकाने डेलकर यांच्या घरी दूरध्वनी करून कुटुंबीयांना त्यांच्याबाबत विचारले व घडलेला प्रकार सांगितला.

त्यावेळी कुटुंबियांनी काही करून  डेलकर यांच्या रूममध्ये जाण्यास सांगितले. अखेर हॉटेल कर्मचार्‍यांच्या मदतीने दरवाजा उघडण्याचा  प्रयत्न करण्यात आला. दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर चालक त्यांच्या बाजूच्या खोलीमध्ये गेला. तेथील बाल्कनीतून त्याने डेलकर यांच्या रूममध्ये प्रवेश केला. त्यावेळी शालच्या मदतीने  ते लटकलेल्या अवस्थेत आढळले.

अनेक स्थानिक कार्यक्रमात त्यांना बोलवले जात नव्हते, मोहन डेलकर यांना वेळोवेळी अपमानीत केलं जात होतं. याबाबत त्यांनी संसदेत आवाज उठवला होता. यावेळी काही स्थानिक अधिकाऱ्यांवर आरोप केला होता. या संदर्भात त्यांनी नितीश कुमार यांची भेटही घेतली होती. यावर  एक समिती स्थापन केली होती. मात्र त्यापूर्वीच मोहन यांनी आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी डेलकर यांनी 15 पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. गुजराती भाषेत ही सुसाईड नोट लिहिली आहे.

mumbai news politics and crime mohan delkar case registered in marine drive police station

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com