पुरुषोत्तम बेर्डे यांना जीवन गौरव पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

मुंबई - मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ (मुंबई) यांच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांना जाहीर झाला आहे. गायक व अभिनेते प्रशांत दामले यांना विशेष कलागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

गुरुवारी (ता.15) सायंकाळी माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात होणाऱ्या सोहळ्यात सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने वाद्यवृंद क्षेत्रातील विविध पुरस्कार या वेळी वितरित करण्यात येणार आहेत. निर्माता पुरस्कार संदीप सातार्डेकर, निवेदन पुरस्कार नरेंद्र बेडेकर, वादन पुरस्कार आबा जामसांडेकर, नृत्य दिग्दर्शक पुरस्कार दीपाली विचारे, गायक पुरस्कार प्रभंजन मराठे, गायिका पुरस्कार अंजली तळेकर, विनोदी कलावंत पुरस्कार जॉनी रावत, ध्वनी संयोजन पुरस्कार उत्तम शिंदे, नेपथ्य पुरस्कार प्रवीण गवळी, प्रकाश योजना पुरस्कार विजय राऊत यांना दिले जाणार आहेत.

Web Title: mumbai news purushottam berde jeevangaurav award