Mumbai News
Mumbai News

Mumbai News : थेट रेल्वे इंजिन वाहतुकीत अपहाराचा प्रयत्न! वडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Published on

मुंबई - रेल्वे इंजिनच्या अपहारप्रकरणी वडाळा टीटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पैश्याच्या वादातून ट्रान्सपोर्ट कंपनीने इंजिनची डिलिव्हरी रोखली होती. मात्र प्रकरण पोलिसांत जाताच तात्काळ रेल्वे इंजिन मुंबईसाठी रवाना करण्यात आले.

Mumbai News
Jyoti Maurya Case : तथाकथित प्रियकर निलंबीत! SDM ज्योती-आलोक मौर्य पुन्हा एकत्र येणार?

रेल्वे इंजिन वडाळा टीटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठरल्याप्रमाणे पैसे न दिल्याचा बहाणा करत मालकाने इंजिनाची डिलिव्हरी थांबवली होती. रेल्वे इंजिन परळ ते कलका येथे तसेच तेथून मुंबईला आणण्याची जबाबदारी एका खाजगी कंपनीला दिली होती. त्यासाठी सव्वा चार लाख रुपये ट्रान्सपोर्टरला देण्याचे ठरले होते. मात्र इंजिन कालका येथे पोहोचताच ट्रान्सपोर्टरचा सुर बदला. त्याने पैसे उशिरा दिल्याचा बहाणा करत आणखीन ६०,००० रुपयांची मागणी केली.

Mumbai News
Baramati : पवारांच्या बालेकिल्ल्याला भाजप लावणार सुरुंग! अजित पवारांच्या मदतीने बारामतीत 'अमेठी पॅटर्न'?

दरम्यान मागणी अमान्य केल्यास रेल्वे इंजिन परत देण्यास मालकाने नकार दिला. त्यावरून हे प्रकरण पोलिसांत गेले. त्यानंतर पोलिसांनी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com