डोळे बांधून साकारल्या तीन लाख मूर्ती!

मुकेश धावडे
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

मुंबई - काम करायची प्रबळ इच्छा व दृढ निश्‍चय असेल तर काहीही शक्‍य होते. सायनमधील जैन सोसायटीत राहणाऱ्या रमा शहा यांनी आपल्या कलेला जिद्द व धाडसाची जोड देत अनोख्या पद्धतीने गणेशमूर्ती साकारल्या आहेत. रमा शहा यांनी १७ वर्षांपासून आतापर्यंत कोणत्याही साचाचा वापर न करता डोळ्यांवर पट्टी बांधून तब्बल तीन लाख ७८ हजार गणेशमूर्ती साकारल्या आहेत. त्यांच्या कलाकृतीची दखल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली आहे. 

रमा शहा यांना लहानपणापासून मूर्ती बनवण्याची आवड होती. सुरुवातीला त्या कृष्ण, दुर्गामातेची मूर्ती बनवत असत. नंतर त्या गणपतीची मूर्ती बनवण्यात रमू लागल्या. १७ वर्षांपासून त्या गणपतीच्या मूर्ती बनवत आहेत. डोळ्यांवर पट्टी बांधून त्या मूर्ती बनवतात. आजपर्यंत त्यांनी तीन लाख ७८ हजार मूर्ती बनवल्या आहेत. गणपतीच्या आशीर्वादामुळेच मला डोळ्यांवर पट्टी बांधून मूर्ती बनवता येत असल्याचे शहा सांगतात. घरातली कामे करून मिळणाऱ्या वेळेत त्या मूर्ती बनवतात. या कार्यात माझ्या कुटुंबाचा मला पाठिंबा मिळत असल्यामुळेच हे शक्‍य असल्याचे शहा यांनी सांगितले. मूर्ती बनवताना आर्थिक फायद्याचा विचार न करता त्या टिकाऊ कशा बनतील, याचा अधिक विचार करते. त्यामुळे मूर्तीसाठी वापरणारे साहित्य हे महागडेच वापरते. मी बनवलेली बाप्पाची मूर्ती जो कोणी घेऊन जाईल त्यांच्या कुटुंबात सुख-शांती नांदावी एवढीच माझी अपेक्षा आहे. त्यामुळे मूर्ती बनवताना मंत्र उच्चार करत प्रत्येक मूर्ती मोठ्या उत्साहाने बनवत असल्याचे त्या म्हणाल्या.

रमा शहा यांचे विक्रम
गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड : १९ हजार १९१ गणेशमूर्तींचे प्रदर्शन. 
दोन वेळा सिद्धिविनायक मंदिरात १२ तास गणेशमूर्ती बनविल्या. 
 २४ तासांत अविरतपणे ९९९ मूर्ती घडवत जागतिक विक्रम.
 १७ वर्षांत तीन लाख ७८ हजार मूर्ती हातांनी बनविल्या. 

Web Title: mumbai news rama shah

टॅग्स