खारघरमधील धार्मिक स्थळांवर कारवाईच्या निषेधार्थ बंद

गजानन चव्हाण 
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

रविवार सुट्टी असल्यामुळे लिटील वर्ल्ड मॉल मध्ये असलेल्या सिनेमागृहात अनेकांनी सकाळ,दुपारच्या शोची अडव्हांस तिकिटे ऑनलाईन बुक केली होती मात्र . सकाळी मॉल मध्ये येताच बंद असल्याची माहिती मिळाल्याने अनेकांनी तिकीटाचे पैसे परत द्यावे लागले. मॉलचे पर्यवेक्षक तुषार खटके म्हणाले अचानक खारघर बंद असल्याचे तसेच काहींनी येवून मॉल बंद करण्यास सांगितल्यामुळे मॉल बंद करावे लागले मात्र,सिनेमा घरात अडव्हांस बुकिंग केलेल्या नागरिकांना तिकिटाचे पैसे परत द्यावे लागले

खारघर - खारघर  वसाहती मधील धार्मिक स्थळांवर सिडकोच्या अतिक्रमण विरोधी विभागाकडून सोमवारी होणाऱ्या    कारवाईच्या निषेधार्थ  सर्व पक्षीयांनी पुकारलेल्या खारघर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. या संपात  खारघर भाजी विक्रेते,रिक्षा चालक आणि टेम्पो चालक मालक संघटनाही सहभागी झाल्याने मात्र नागरिकांचे हाल झाले. 

खारघर परिसरात सिडकोच्या भूखंडावर 2009 नंतर उभारण्यात आलेल्या धार्मिकस्थळ अनधिकृत असल्याची सिडकोने वर्तमान पत्र तसेच धार्मिक स्थळांना नोटीस दिली होती. शुक्रवारी कळंबोली परिसरातील धार्मिक स्थळावर कारवाई केल्यानंतर सिडकोने सोमवारी खारघर मधील 16 धार्मिक स्थळावर सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाकडून कारवाईसाठी खारघर पोलिसाकडून पोलीस बंदोबस्त मागितल्याची माहिती मिळताच शनिवार खारघर मधील सर्व राजकीय पक्षांनी शनिवार सायंकाळी बैठक घेवून रविवारी खारघर बंदची हाक दिली होती.

सकाळी काही दुकानदारांना माहिती नसल्यामुळे दुकान सुरु करून बसताच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी  त्यांना बंद करण्यास सांगितले.  रुग्णालय,औषध दुकाने वगळता खारघर मधील डी मार्ट,लिटील वर्ल्ड मॉल,अपना बाजार, डेली बाजार आदि मॉलही बंद होते. डेली बाजार कडून चेरोबा मंदिर आणि डी मार्टच्या रांगेतील काही दुकानदार  दुकाने सुरु  ठेवली होती. मात्र सदर दुकानात ग्राहकांनी पाठ फिरविली होती. बंद मध्ये  खारघर व्यापारी असोसिएशन,रिक्षा चालक संघटना,टेम्पो चालक मालक संघटना,भाजी विक्रेते सहभागी झाले काही उचित प्रकार घडू नये म्हणून खारघर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. डी मार्ट आणि लिटील वर्ल्ड मॉल मध्ये खरेदीसाठी आलेल्या बंद असल्यामुळे माघारी फिरावे लागले. अचानक रिक्षा चालक बंद मध्ये सहभागी झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. शिल्प चौक मध्ये रिक्षाच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या भारती नावाची महिलांना नाराजी व्यक्त केली. अचानक रिक्षा बंद केल्या बद्दल तिने नाराजी व्यक्त केली. या बंद विषयी खारघर एकता व्यापारी असोसिएशन अध्यक्ष विजय पाटील म्हणाले आम्ही न्यायालयाचे आदर व्यक्त करतो. परंतु सिडकोकडून नागरिकांची बाजू ऐकून न घेतल्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्यामुळे बंद ठेवण्यात आला होता.त्यास नागरिकाकडून चांगला प्रतिसाद मिळाला. 

कारवाईच्या विरोधात वाट पेटण्याची शक्यता

मुर्बी तसेच पेठ मधील गावातील  ग्रामस्थांची पूर्वी पासून असलेल्या गावदेवी मंदिरास अनधिकृत ठरविले आहेत.पुरातून मंदिरावर सिडकोची कारवाई झाल्यास ग्रामस्थ आणि सिडको वाद पेटण्याची शक्यता आहे. मुर्बी ग्रामस्थ भरत पाटील म्हणाले. गुगल मध्ये मुर्बी गाव देवी मंदिर असे दर्शविले आहे.असे असूनही सिडकोकडून कारवाई झाल्यास न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे सांगितले. . 

सिनेमा पाह्ण्यासात्शी आलेल्यांना पैसे परत द्यावे लागले 

रविवार सुट्टी असल्यामुळे लिटील वर्ल्ड मॉल मध्ये असलेल्या सिनेमागृहात अनेकांनी सकाळ,दुपारच्या शोची अडव्हांस तिकिटे ऑनलाईन बुक केली होती मात्र . सकाळी मॉल मध्ये येताच बंद असल्याची माहिती मिळाल्याने अनेकांनी तिकीटाचे पैसे परत द्यावे लागले. मॉलचे पर्यवेक्षक तुषार खटके म्हणाले अचानक खारघर बंद असल्याचे तसेच काहींनी येवून मॉल बंद करण्यास सांगितल्यामुळे मॉल बंद करावे लागले मात्र,सिनेमा घरात अडव्हांस बुकिंग केलेल्या नागरिकांना तिकिटाचे पैसे परत द्यावे लागले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news: strike