शिक्षकांच्या पगारासाठी अजून दोन दिवस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

मुंबई - शालार्थ प्रणालीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्याचा पगार अजून झालेला नाही. त्यामुळे ऑफलाइन पगार मिळणार असल्याची घोषणा राज्याच्या शिक्षण विभागाने केली असली, तरी पगारासाठी 10 फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शालार्थ प्रणालीतून 20 जानेवारीपासून ऑनलाइन पेयबिल प्रक्रिया अडचणीत सापडली आहे. त्यानंतर शिक्षण विभागाने शालार्थ प्रणालीच्या दुरुस्तीची सबब पुढे केली. महिन्याच्या शेवटापर्यंत शालार्थ प्रणाली सुरू न झाल्याने अखेर राज्यभरातील बहुतांश शिक्षकांच्या पगाराची एक तारीख चुकली.

यानंतर शिक्षकांच्या संतापाचा भडका उडू नये, म्हणून शिक्षण विभागाने त्वरित 1 फेब्रुवारीला ऑफलाइन पगाराचा निर्णय घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिक्षण संचालकांकडून परिपत्रकातून ऑफलाइन पगाराचा आदेश दिला; मात्र शिक्षण आणि वित्त विभागामधील संवादातील त्रुटीबरोबरच प्रशासकीय अडचणींत पगाराची तारीख निश्‍चित झाली नाही, असे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडिज यांनी सांगितले. शिक्षण व वित्त विभागाने सामूहिक निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: mumbai news teacher salary