Ulhasnagar News: उल्हासनगर महानगरपालिकेची स्वच्छ सर्वेक्षणात मागच्यापेक्षा प्रगतीची झेप!

देशात 151 वरून 110, राज्यात 30 वरून 21,
Mumbai News
Mumbai Newssakal

सातत्याने स्वछतेचे विविध उपक्रम राबवणाऱ्या उल्हासनगर महानगरपालिकेने केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियायात मागच्या 2022 या वर्षापेक्षा 2023 या वर्षात प्रगतीची झेप घेतली आहे.पालिकेचा 2022 मध्ये देशातील 446 शहरात 151 वा आणि महाराष्ट्रातील 44 शहरात 30 वा क्रमांक आला होता.2023 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहराने देशात 151 वरून 110 आणि राज्यात 30 वरून 21 अशी झेप घेतल्याने 2024 मध्ये आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये 10 च्या आत स्थान मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.

केंद्र शासनाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून एक लाखाच्या वर लोकसंख्या असलेल्या देशातील सर्व शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येत आहे.त्यानुसार 2022 मध्ये आयुक्त अजीज शेख यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर,उपायुक्त डॉ.सुभाष जाधव,सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे,मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार,विनोद केणे यांच्यासोबत मुकादम,सफाई कर्मचारी,सामाजिक संस्था,शैक्षणिक संस्था,राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी अनेकदा राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेत भाग घेतला.

यासोबतच घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे,कचरा साचण्याचे ठिकाण विकसित करणे,स्वच्छतेबाबत रहिवाशांमध्ये जनजागृती करणे,शहर कचरा कुंड्या मुक्त करणे अशा नाविन्य पूर्ण पद्धती महापालिकेने राबवल्या आहेत.त्यामुळेच महापालिकेस स्वच्छता सर्वेक्षणात राज्यात 21 वे स्थान प्राप्त झाले आहे.महापालिकेचे नियोजित घनकचरा प्रक्रिया प्रकल्प व कचरा वर्गीकरण केंद्र सुरु झाल्यास 2024 मध्ये महापालिका 10 च्या आत मजल मारेल असा विश्वास आयुक्त अजीज शेख यांनी व्यक्त केला आहे.

""2024 साठी कंबर कसली""

रोड डिव्हायडर्स मध्ये लक्ष वेधणाऱ्या शोभिवंत झाडांची रोपटे लावली जात असून डिव्हायडर्सच्या भिंतींची रंगरंगोटी केली जात आहे.हे काम पवन ऍडव्हाटाईज कडून विनामूल्य केले जात असून त्याबदल्यात त्यांना डिव्हायडर्सच्या मधोमध लावण्यात आलेल्या चौकोटी फ्रेमवर जाहिराती लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.यासोबतच विविध भिंतींवर सकारात्मक संदेश देणारे तैलचित्र साकारण्यात येत आहेत.चौक देखील निसर्गाने वलयांकित करण्यास सुरुवात केली असून खालच्या गोलाकार भागाला रेडियम लावण्यात आल्याने रात्रीच्या सुमारास चौक अधिक उजळून दिसू लागला आहे.विविध भागात डीप क्लीन स्वच्छता मोहीम देखील राबवण्यात येत असल्याने उल्हासनगर महानगरपालिकेने 2024 साठी कंबर कसल्याचे चित्र दिसू लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com