मुंबईच्या माझगावातील हवा अतिशय प्रदूषित; दिल्लीलाही टाकलं मागे

दिल्लीलाही टाकलं मागे, सलग दुसऱ्या दिवशीही हवा खराब
Air Pollution
Air PollutionSakal media

मुंबई : मुंबईकरांना सध्या गुलाबी थंडीची चाहूल (Winter in Mumbai) लागली आहे. मात्र, डिसेंबर महिन्याच्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा (Air in Mumbai) स्तर बराच खालावला आहे. यातून मुंबईकरांमध्ये आजार बळावण्याची (Disease possibility) शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुंबईतील माझगावमधील (Mazgaon Air worst than delhi) हवेने दिल्लीलाही मागे टाकले असल्याचे समोर आले आहे.

Air Pollution
नवीन वर्षात लोकलमध्ये वाय-फाय सुविधा; १६५ लोकलमधील ३,४६५ डब्यांत सेवा

मुंबईकरांना सध्या गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. मात्र, डिसेंबर महिन्याच्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा स्तर बराच खालावला आहे. यातुन मुंबईकरांमध्ये आजार बळावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुंबईतील माझगाव मधील हवेने दिल्लीलाही मागे टाकले आहे. दिल्लीतील संपूर्ण शहराचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक अतिशय वाईट नोंदला गेला असून एक्यूआय 290 वर आहे तर त्या तुलनेत माझगावातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक अतिशय वाईट आणि एक्यूआय 365 वर नोंद गेला आहे.

यापाठोपाठ कुलाब्यातील हवा दूषित नोंदली गेली असून एक्यूआय 355 एवढा आहे. तर, संपूर्ण मुंबई शहरातील प्रदूषणाची पातळी 300 एक्यूआय झाल्याने हवेचा स्तर 'वाईट' नोंदवला गेला. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील हवा अतिशय प्रदूषित नोंदली गेली आहे. शुक्रवारीही सफरने मुंबईची हवा वाईट दर्जाची नोंदवण्यात आली होती. यातून, संपूर्ण मुंबईच्या परिसरांच्या तुलनेत माझगाव परिसरातील हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित असल्याचे सफर या हवेची गुणवत्ता तपासणाऱ्या आणि नोंद करणाऱ्या प्रणालीने अहवाल दिला आहे.

Air Pollution
मुंबई : रेशन धान्याचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड; 24 जणांना अटक

पावसाळ्यानंतर अवकाळी पाऊस झाल्याने मुंबईतील वातावरण स्वच्छ होते. त्यानंतर आता जमिनिकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे धूलिकण वाहून न जाता जमिनीलगत हवेत तरंगत आहेत. त्यामुळे पावसाळ्यातील स्वच्छ हवामान आता बदलू लागलं आहे. प्रदूषणाची पातळी वाढू लागली असून हवा गुणवत्ता निर्देशांक अतिशय वाईट पातळीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे, मुंबईकरांनी सावधानता आणि काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टर्स करतात. सफरने शुक्रवारी दिल्लीचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक 290 एवढा नोंदवला आहे. तर, त्यापाठोपाठ मुंबईतील माझगाव परिसरातील 365 हवेचा गुणवत्ता निर्देशांक नोंदला.

कुलाबा परिसरात 355 हवेचा गुणवत्ता निर्देशांक नोंदला गेला असून इथे अतिशय वाईट दर्जाच्या हवेची नोंद झाली आहे. दरम्यान, सोमवारी कुलाबा परिसरातील हवेचा दर्जा अतिशय वाईट या श्रेणीत नोंदला गेला आहे. मुंबईतील कुलाबा आणि माझगाव मध्ये सर्वाधिक प्रदूषण नोंदवले गेले.  कुलाबा येथील हवा गुणवत्ता निर्देशांक 355 तर माझगाव मधील हवा गुणवत्ता निर्देशांक 365 अतिशय वाईट नोंदवला गेला आहे. तर मालाड आणि बीकेसीमधील हवेचा गुणवत्ता निर्देशांक अनुक्रमे 309 आणि 290 नोंदवला गेला. भांडुप 128 ,वरळी 180, बोरीवली 176 ,चेंबूर 256, अंधेरी 256, नवी मुंबई येथे हवा गुणवत्ता निर्देशांक हा 232 नोंदवला असून वाईट दर्जा  आहे. मुंबईतील कोणत्याही परिसरतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक उत्तम किंवा समाधानकारक नोंदवला गेलेला नाही.

श्वासाचे विकार बळावणार

मुंबई शहर व उपनगरातील हवेचा दर्जा अती वाईट स्तरावर पोहचला असल्यामुळे शहरातील श्वसनविकार तसेच हृदय विकार असलेल्या रुग्णांसाठी धोकादायक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. हवा  प्रदूषणाने माणसाच्या श्वसनसंस्थेला फटका बसतो. फुफ्फुसाचा कर्करोग, विविध प्रकारचे हृदयरोग जडण्यासाठी श्वसनातून शरीरात घुसणारी अस्वच्छ हवा कारणीभूत ठरते. त्यामुळे, नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन डॉक्टर्स करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com