
मुंबई : निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावाने मुंबईत मोठी पडझड झाली. सांताक्रुझ येथे एक झाड काही घरांवर कोसळले. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. दिवसभरात 117 झाडे पडली तर 9 घरांच्या भिती कोसळल्या. किनारी भागातून 18 हजारहून अधिक नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. मुंबईत दिवसभर सुर्यांचेही दर्शन झाले नाही. लॉकडाऊन आणि वादळाच्या भितीमुळे मुंबईतील अनेक रस्तेही ओस पडले होते.
मुंबईत मंगळवार संध्याकाळ पासून जोरदार वार्यांसह पावसाची रिप रिप सुरु होती. ती बुधवार रात्रीपर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती. सकाळपासूनच वाऱ्याचा जोर वाढला होता. काही ठिकाऴी वार्यांचा वेग नेहमी पेक्षा सहा ते सात पटीने वाढला होता. म्हणजे ताशी 70 किमी पर्यंत वार्यांचा वेग नोंदविण्यात आला.
कुलाबा येथे 45.2 मिमी आणि सांताक्रुझ येथे 23.4 मिमी पाऊस कोसळला आहे. मुंबईवरील वादळाचा धोका टळला असला तरी शहरातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत बुधवारी सकाळपासून 9 घरांच्या भिंती कोसळल्याच्या घटना नोदविण्यात आल्या आहेत. यात शहरात 3, पश्चिम उपनगरात 4 आणि पुर्व उपनगरात 2 ठिकाणी या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. तर 39 ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या आहेत.
गुरुवारी गारवा
जोरदार वाऱ्यासह दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे तापमानातही घट झाली आहे. सांताक्रुझ येथे कमाल 34 आणि किमान 28.4 अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे कमाल 31 आणि किमान 26.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर गुरुवारी तापमानात घट होऊन कमाल तापमान 26 आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस पर्यंत राहाणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
117 झाडे पडली
मुंबईत वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने 117 झाडे पडल्याच्या घटना घडल्या. शहर भागात 39, पश्चिम उपनगरात 38 आणि पुर्व उपनगरात 40 झाडे पडली. ही झाडे गाड्यांवर पडल्यामुळे मालकांचे नुकसान झाले.
नागरीकांची तपासणी होणार
वादळापासून संरक्षणासाठी 35 निवारा केंद्रात हलविण्यात आलेल्या 18 हजार हून अधिक नागरीकांची तपासणी करण्यात येणार आहे. यात कोविड सदृष्य लक्षणं असणार्यांना कोविड उपचार केंद्रात पाठविण्यात येईल. तर इतरांना घरी पाठविण्यात येईल.
mumbai nisarga cyclone and one terrific day read mumbais story of cyclone
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.