esakal | चिंताजनक बातमी: मुंबईत लॉकडाऊन काळातही वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या

बोलून बातमी शोधा

Corona Virus
चिंताजनक बातमी: लॉकडाऊन काळातही वाढतेय रुग्णांची संख्या
sakal_logo
By
मिलिंद तांबे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई: वाढत्या कोरोना संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आले. लॉकडाऊनच्या गेल्या 15 दिवसात मुंबईत तब्बल 82 हजार 709 नव्या रुग्णांची भर पडली. तर 643 रुग्ण दगावले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांपूर्वी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यावेळी मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या 5 लाख 44 हजार 942 इतकी होती. त्यात गेल्या 15 दिवसात 82 हजार 709 रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 6 लाख 27 हजार 651 इतकी झाली.

रुग्णवाढीचा दर 1.71 वरून कमी होऊन 1.17 पर्यंत खाली आला. रुग्ण बरे होण्याचा दर मात्र वाढला असून तो 81 टक्क्यांवरून 86 टक्क्यांवर गेला. तर रुग्ण दुपटीचा दर 40 दिवसांवरून वाढून 58 दिवसांवर गेला. मुंबईत रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढल्याने मृतांचा दर ही 2 वरून 2.4 टक्क्यांवर गेला आहे. 15 दिवसांपूर्वी मुंबईत एकूण 12 हजार 140 मृत्यू नोंदवण्यात आले होते. त्यात 643 मृत्यूची भर पडली असून मृतांचा आकडा 12 हजार 783 वर पोहोचला.

हेही वाचा: राज्यातील बार नुतनीकरण रेंगाळत, अद्याप कोणताही निर्णय नाही

मुंबईत सर्वाधिक रुग्णवाढ ही के पश्चिम येथे झाली असून तेथील एकूण रुग्णसंख्या 44 हजार 754 इतकी आहे तर सर्वात कमी रुग्ण बी वॉर्ड मध्ये 3473 इतकी नोंदवण्यात आली आहे.

-----------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai number corona patients increasing during lockdown 643 patients died