मुंबईत रुग्णवाढीचा पुन्हा भडका...आज 1,432 नवीन रुग्णांची भर; वाचा इतर सविस्तर आकडेवारी

मिलिंद तांबे
Saturday, 29 August 2020

कोरोना रूग्णवाढ नियंत्रणात आणणा-या मुंबईत पुन्हा एकदा बाधित रुग्णांचा भडका उडण्यास सुरूवात झाली असून आज 1,432 रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबई : कोरोना रूग्णवाढ नियंत्रणात आणणा-या मुंबईत पुन्हा एकदा बाधित रुग्णांचा भडका उडण्यास सुरूवात झाली असून आज 1,432 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,43,389 झाली आहे.मुंबईत आज 31 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,593 वर पोचला आहे. मुंबईत आज 682 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 81 टक्के इतका आहे.                                                

लाॅकडाऊन काळात रेल्वे मालवाहतुकीमुळे 'मालामाल'; गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात 4.3 टक्याने वाढ

मुंबईत आज नोंद झालेल्या 31 मृत्यूंपैकी 22 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 23 पुरुष तर 8 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 31 रुग्णांपैकी एकाचे वय 40 वर्षा खालील होते. 18 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 12 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.                   
कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 682 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,15,500 रुग्णांना घरी सोडण्यात आले.मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 88 दिवसांवर गेला आहे. तर 28 ऑगस्ट पर्यंत एकूण 7,53,869  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर  22 ऑगस्ट  ते 28 ऑगस्ट  दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.79 इतका आहे. 

मुंबईकरांनो संकट टळलेलं नाही! वांद्रे, कुलाब्यात कोरोना संसर्गात वाढ; उत्तर मुंबईची परिस्थिती जैसे थे

मुंबईत 556 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 5,916 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 4,863 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 2,540 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Mumbai, the number of patients started increasing again ... Today, 1,432 new patients were added; Read other detailed statistics