मुंबई : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर धारावीत कोविड विरोधात त्रिसुत्री

Omicron variant
Omicron variantSakal

मुंबई: टांझानियातून आलेल्या धारावीतील (Dharavi) नागरिकाला (Omicron variant patient) ओमिक्रॅानची बाधा झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर धारावीत आता कोविड विरोधात त्रिसुत्री वापरण्यात येणार आहे. कोविड चाचण्या (corona test), लसीकरण (corona vaccination) आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांचे निर्जुंतूकीकरण (public toilets cleaning) करण्यावर भर देण्यात येणार आहे.

Omicron variant
डोंबिवली : दहा दिवसांत तीन तडीपार गुंडांचा घेतला शोध; तिघांना अटक

'माझी आस्थापना सुरक्षीत आस्थापना’ मोहीमे अंतर्गत धारावीतील कारखान्यांमधील कामागारांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर रहिवाशांच्या लसिकरणासाठीही विशेष मोहीम राबविणार आहे. धारावी परीसरात कोविड पूर्णपणे नियंत्रणात आहे. उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या सातच आहे. तर, तुरळक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. असे असले तरी ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा पालिका कामाला लागली आहे.

धारावी परिसरात पुन्हा स्क्रिनिंग करण्याबरोबरच कोविड चाचण्याची संख्या वाढविण्यात येईल असे पालिकेच्या जी उत्तर प्रभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले. त्यासाठी शिबीरही घेण्यात येईल. या परिसरातील 80 टक्के नागरिक सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर होतो. साधारण 450 सार्वजनिक शौचालय आहेत. स्वच्छतागृहांचे दिवसातून पाच वेळा सॅनिटायझेशनही करण्यात येत आहे, असेही सांगण्यात आले.

Omicron variant
BMC : मुंबईतील सर्व रस्त्यांवर होणार 'स्मार्ट सिग्नल' यंत्रणा

लसिकरणाचा वेग वाढविण्यासाठी महानगरपालिका विशेष माेहीम राबविणार आहे. धारावातील कारखान्यात काम करणाऱ्या कामागारांचे लसीकरण करण्यासही प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर रहिवाशांच्या लसीकरणासाठीही विशेष मोहीम राबवली जाईल. कोविडच्या पहिल्या लाटेत धारावी पॅटर्नने जगात नाव मिळवले होते. त्यानंतर आता ओमिक्रॉन बाधीत रुग्णही आढळल्याने महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा धारावी पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. धारावीत आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील दोन व्यक्तींच्याही कोविडच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यांचे अहवाल नकारात्मक आले आहे.

47 टक्के लसीकरण

धारावीत लसीकरणासाठी पात्र असलेली स्थायीक लोकसंख्या 4 लाख 80 हजाराच्या आसपास आहे. तर, रोजगारासाठी आलेल्यांची संख्या मिळून हा आकडा सात ते आठ लाखापर्यंत जातो. आतापर्यंत या भागात 47 टक्क्यांच्या आसपास लसीकरण झाले आहे.त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मोहीम राबवली जाईल.घरा घरात जाऊन सर्वेक्षण करुन लसीकरणाचे लक्ष पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईल.

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरात परदेशातून आलेल्या नागरिकांनी आपल्या स्थानिक आरोग्य विभागाला अवगत करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ओमिक्राॅनबाधीत व्यक्तींमध्ये आजाराची साैम्य लक्षणे आहेत.त सेच, नागररिकांनी मास्क वापरणे, वैयक्तीक स्वच्छता राखणे आणि सुरक्षीत अंतर पाळणे या त्रिसुत्रीचाा वापर करावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com