मुंबईत ओमिक्रॉन संसर्गा संदर्भात सर्वेक्षण; जाणून घ्या सविस्तर माहिती

Omicron variant
Omicron variantsakal media

मुंबई : मुंबई (Mumbai) शहरात 1 नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे (commuters from Abroad) क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. त्यामध्ये अतिजोखामिच्या देशातून आलेल्या प्रवाशांपैकी 17 प्रवाशांचे कोविड निदान (corona Diagnosis) झाले असून त्यामध्ये 13 पुरुष व 4 स्त्रिया यांचा समावेश आहे. सदर रुग्णांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांचे नमुने जनुकीय विश्लेषणासाठी (Genome sequencing) पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत एक रुग्ण ओमायक्रॉन बाधित (Omicron variant) आहे. तसेच सहवासितांच्या सर्वेक्षण मध्ये 9 नागरिकांचे (4 पुरुष, 5 स्त्रिया ) कोविड निदान झाले असून त्यात एक ओमायक्रॉन बाधित आहे.

या व्यतिरिक्त मुंबई विमानतळावर दिनांक 6 डिसेंबर पर्यंत अतिजोखामिच्या देशामधून 4845 प्रवाश्यांचे आगमन झाले असून त्यापैकी विमानतळावर होणाऱ्या चाचण्यांपैकी 6 मुंबई निवासी प्रवाश्यांचे कोविड निदान झाले असून त्यामध्ये सर्व पुरुष आहेत. सदर रुग्णांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांचे नमुने जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. एकही रुग्ण गंभीर स्थितीत नाही.

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरूप वर्तनाचा अंगीकार करावा. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिन्याभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत त्यांनाही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन मुंबई महानगर पालीकेच्या आरोग्य विभागाच्या वतीन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com