Mumbai : मुंबईकरांना राखीव साठ्यातील दीड दशलक्ष लिटर पाणी जुलैअखेर पुरविणार; सरकारचा निर्णय

Mumbai
Mumbai

मुंबई - मुंबईला धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पावसाळा लांबल्यास मुंबईत पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकार आपल्या धरणांतील राखीव साठ्यातील दीड लाख दशलक्ष लिटर पाणी मुंबईला देण्याचा निर्णय घेतला आहे. या राखीव साठ्यामुळे मुंबईत जुलै अखेरपर्यंत पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

Mumbai
Mumbai Crime : एसबीआय बँक फसवणूक प्रकरणी बिल्डर हरेश मेहतांना CBIकडून अटक

पाणी संकट टळले

तलावांतील पाणीसाठा कमी झाल्याने मुंबईवर १० ते १५ टक्के पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. काळात राज्य सरकारने पालिकेला राखीव कोट्यातील पाणी देण्याचे मान्य केल्याने पाणी कपात टळणार की पुढील काही दिवसांची तरतूद म्हणून प्रशासन पाणी कपात करणार असा प्रश्न निर्माम झाला आहे. मात्र तूर्तास कपात केली जाणार नाही.

Mumbai
Maharashtra Politics : कोल्हापूरची जागा कोणाच्या कुंडलीत लवकरच कळेल! भाजपच्या सिंधीयांचा शिंदे सेनेवर निशाणा?

काँग्रेसचा विरोध

पालिकेने प्रस्तावित केलेल्या पाणीपट्टी दरवाढीला भाजप आणि काँग्रेसने विरोध केला आहे. पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी जलबोगदा फुटीमुळे महिनाभर मुंबईत मोठी पाणीकपात करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईकरांना खूप त्रास सहन करावा लागला होता. आधीच मुंबईकरांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यात दरवाढ करून समस्येत आणखी भर टाकू नये, असे रवी राजा यांनी सांगितले.

तलावांतील पाणीसाठा टक्के (दशलक्ष लिटरमध्ये)

तलाव पाणीसाठा

मोडक सागर ३४,०२८ २६.३९

तानसा ३३,५६८ २३.१४

मध्य वैतरणा २३,२३० १२.००

भातसा ६७,०४६ ९.३५

विहार ७,२०२ २६.४५

तुलसी २,४७६ ३०.७८

तीन वर्षांतील ५ जूनचा साठा

(दशलक्ष लिटर) ( टक्के)

२०२३ १,६७, ५४९ (११.५८)

२०२२ २,२९, ०८० ( १५.८३)

२०२१ १,९४,३३१ ( १३.४३ )

पाणीकपातीचा सध्या कोणताही विचार नाही. अप्पर वैतरणा व भातसा धरणातून प्रत्येकी ७५ हजार दशलक्ष लिटर पाणी राखीव साठ्यातून मिळणार आहे.

- पुरूषोत्तम माळवदे, मुख्य अभियंता (जल विभाग), मुंबई महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com