Mumbai News
Mumbai News

Mumbai rain : रमाबाई आंबेडकर नगर येथील घराचा भाग कोसळला; एकाच कुटुंबातील चार जखमी

मुंबई - घाटकोपर पूर्व राजावाडी कॉलनीतील बिल्डिंग खचून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रमाबाई आंबेडकर नगर कॉलनीतील चाळ नंबर २१मधील तळ अधिक एक मजली झोपड्याचे बांधकाम कोसळले.

Mumbai News
Akola Crime : खासगी वसतिगृहात युवतीची आत्महत्या; NEET परीक्षेची करत होती तयारी

या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

घाटकोपर पूर्व रमाबाई आंबेडकर कॉलनी, आंबेडकर पुतळ्याजवळ, चाळ नंबर २१ ही तळ अधिक एक मजली बांधकाम असलेल्या झोपड्य़ाचा वरच्या मजल्याचा भाग सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले.

Mumbai News
Fadnavis Vs Pawar: शरद पवारांच्या बंडापेक्षा शिंदेंचं बंड दर्जात्मक! फडणवीसांनी उपस्थित केला 'हा' नवा सवाल

महादेव खिल्लारे (५०), सुनिता खिल्लारे (४२), रोहित खिल्लारे ( २३) व वैभव खिल्लारे (२०) हे एकाच कुटुंबातील आई वडील व दोन मुले असे चौघे जखमी झाले. चौघांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com