esakal | लसीकरणासाठी मुंबईकरांची गर्दी, फक्त एका दिवसांचा लसीचा साठा शिल्लक
sakal

बोलून बातमी शोधा

crowd for vaccination

लसीकरणासाठी मुंबईकरांची गर्दी, फक्त एका दिवसांचा लसीचा साठा शिल्लक

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड: सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत पुन्हा एकदा लसीकरण मोहिमेनं जोर धरला आहे. लसींचा 1 लाख 58 हजार एवढा साठा मुंबई पालिकेला मिळाला आहे. या डोसचे वितरण मुंबईच्या 132 खासगी आणि पालिका लसीकरण केंद्रांना करण्यात आला आहे.  1 लाख 58 हजार लाख लसींच्या डोसपैकी दिड लाख डोस कोव्हिशील्ड लसीचे आहेत. तर 8 हजार कोव्हॅक्सिन लसीचे डोस आहेत. दरम्यान, मुंबईतील लसीकरण केंद्रावर मुंबईकरांनी लस घेण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान सोमवारी गोरेगावच्या नेस्को केंद्राबाहेर लसीकरणासाठी नागरिकांच्या पहाटे चार वाजल्यापासूनच रांगा पाहायला मिळाल्या.  तर, बीकेसी कोविड लसीकरण केंद्रांतही असेच चित्र पाहायला मिळाले. ज्येष्ठांपासून 45 वयोगटातील नागरीकांनी लसीकरण केंद्रांवर उपस्थिती दर्शवली.

दरम्यान, सोमवारी सर्व 135 लसीकरण केंद्रांवर लसीकरण झाले असून दिवसभरात 45 हजार 326 लोकांचे लसीकरण करण्यात आले. कोव्हॅक्सिनचे डोस कमी असल्यामुळे फक्त 3 हजार 320 लोकांनाच डोस देण्यात आले. 1087 लोकांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस तर 2 हजार 233 लोकांना दुसरा डोस देण्यात आला. 21 खासगी लसीकरण केंद्रांनी सोमवारी लसीकरण घेतले नाही अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

फक्त एका दिवसांचा साठा शिल्लक

पालिकेने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत किमान 70 ते 80 हजार लोकांचे लसीकरण झाले असेल. कारण पहिल्याच शिफ्टमध्ये 45 हजार लोकांचे लसीकरण झाले होते. दुसर्‍या शिफ्टचा अहवाल यात दिलेला नसून तो आजच्या प्रसिद्ध पत्रकात दिला जाईल.  म्हणजेच सोमवारी दिवसभरात 70 हजारांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यानुसार, फक्त आजसाठीचे डोस लसीकरण केंद्रांकडे असतील. 10 दिवसांचा साठा मागितला जातो. पण, उपलब्‍धतेनुसार डोस पुरवले जात आहेत.

डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai people crowd for vaccination only one day worth of vaccine left

loading image