मुंबई पोलिसांना सतावतोय 'याचा' धोका, पोलिेसांबाबतची धक्कादायक बाब उघड

मुंबई पोलिसांना सतावतोय 'याचा' धोका, पोलिेसांबाबतची धक्कादायक बाब उघड

मुंबई : अहोरात्र वाहनांनी गजबजलेल्या मुंबईचा वेग सुरळीत राखण्याचं काम करतात ते वाहतूक पोलिस. मात्र, आता याच पोलिसांचं आरोग्य बिघडलंय. सतत वाहनांच्या गर्दीत आणि कर्णकर्कश आवाजात राहून वाहतूक पोलिस बहिरे होऊ लागलेत.

आपण कुठे जात असताना मागून कुणी सारखा गाडीचा हॉर्न वाजवत असेल तर आपल्याला किती त्रास होतो. हा आवाज आपण अजिबात सहन करू शकत नाही. मग भर ट्रॅफिकमध्ये उभे असलेले पोलिस कसा हा आवाज सहन करत असतील, याची कल्पनाही करवत नाही. सतत कानावर पडत असलेल्या या गोंगाटामुळे मुंबई पोलिस दलातल्या तीन टक्के वाहतूक पोलिसांना बहिरेपणा आलाय.

मुंबई वाहतूक पोलिस आणि केईएस हॉस्पिटल यांनी नुकतीच एक पाहणी केलीय. त्यात ही धक्कादायक माहिती समोर आलीय. यामध्ये मुंबईतील पोलिस बहिरे होतायत. नुसतं बहिरेपण नाही तर त्यांना अनेक  देखील होतायत. 

आजघडीला मुंबईत 33 लाखांच्या आसपास वाहनं आहेत. या वाहतुकीचं नियोजन करण्यासाठी जवळपास 2 हजार पोलिस आहेत. मात्र, वाहनांचे आवाज, रस्त्यावरील धूळ, धूर यांचा गंभीर परिणाम वाहतूक पोलिसांच्या आरोग्यावर होतोय. यात हवालदारापासून सहाय्यक आयुक्तांपर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अहवालानुसार 26 टक्के पोलिसांना ताणतणाव, 20 टक्के पोलिसांना उच्च रक्तदाब, 14 टक्के पोलिसांना मधुमेहाचा त्रास असल्याचं दिसून आलंय..त्याशिवाय डोळ्यांचे विविध त्रास त्वचाविकार यांचाही त्रास पोलिसांना होतोय..सर्वांत गंभीर बाब वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे म्हणजे 3 टक्के पोलिसांना बहिरेपणा आलाय..


कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र, आपली जबाबदारी पार पाडताना, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असेल तर सर्वच यंत्रणांनी त्याचा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे.

mumbai police are becoming deaf due to traffic and honking

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com