lockdown 31st  guideline Mumbai Lockdown Restrictions
lockdown 31st guideline Mumbai Lockdown Restrictionsesakal

31st आधी नवी नियमावली, संध्याकाळपासून पार्क, समुद्रकिनारे, मैदाने बंद

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि तिसऱ्या लाटेची सुरुवात यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध आणखी कडक करण्यात आले. (New Lockdown Restrictions for in Mumbai)

त्यातच आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 31st च्या सेलिब्रेशनसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. ओमिक्रॉनचं वाढतं संकट रोखण्यासाठी आणि 31st ला होणाऱ्या पार्ट्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही नियमावली जारी करण्यात आली आहे. (Omicron in Mumbai)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी समुद्रकिनारे, पार्क, मोकळी मैदानं आणि सगळ्या सार्वजनिक जागा संध्याकाळी 5 वाजेपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. संध्याकाळी 5 वाजल्यापासून ही सार्वजनिक ठिकाणं बंद असतील. (Mumbai Lockdown Restrictions)

कोणालाही या ठिकाणांवर प्रवेश दिला जाणार नाही. 31 डिसेंबर 2021 च्या दुपारी 1 वाजेपासून पासून हे नियम लागू झाले आहेत. 15 जानेवारी 2022 पर्यंत ते लागू असतील. (Night Curfew in Mumbai)

या सार्वजनिक ठिकाणांसोबतच मुंबई पोलिसांनी आणखीही काही नियम लागू केले आहेत. हॉलमध्ये किंवा मोकळ्या जागेत असलेल्या लग्नासाठी फक्त 50 जणांनाच एकत्र येण्याची परवानगी असेल. कोणत्याही राजकिय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाला 50 पेक्षा जास्त नागरीक एकत्र येऊ शकणार नाहीत. (Maharashtra Lockdown Updates)

  • कोणाच्याही अंत्यसंस्काराला 20 पेक्षा जास्त नागरीकांना हजर राहता येणार नाही. (new covid guidelines in Mumbai today)

  • याआधी लागू असलेले नवीन वर्षाच्या स्वागताच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

  • राज्यात अथवा राज्याच्या कोणत्याही भागात सार्वजनिक स्थळे, पर्यटन स्थळे, गर्दीची ठिकाणी, बीच, मोकळ्या जागा, खुली मैदाने आदी ठिकाणी गर्दी करण्यास मज्जाव. संबंधित ठिकाणच्या प्रशासनाने जमावबंदीचे कलम १४४ लागू

  • मोकळ्या तसेच बंदिस्त जागेत पार पाडल्या जाणाऱ्या विवाह समारंभातील उपस्थितीवर मर्यादा आणली असून, एका सोहळ्यात जास्तीत ५० जणांची उपस्थिती.

  • सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आदी कार्यक्रम उघड्या अथवा बंदिस्त जागी आयोजित केले असतील तर अशा ठिकाणी ५० पेक्षा जास्त जणांना उपस्थित राहता येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com