मुंबई पोलीस दल कठिण परिस्थितीतून जात आहे - हेमंत नगराळे 

hemant.jpg
hemant.jpg

सध्या मुंबई पोलीस दल कठीण परिस्थितीमधून जात आहे. ही परिस्थिती  सगळ्यांच्या मदतीने बदलण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी नेमणूक केली आहे असे मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. 

पुढच्या काही दिवसात मुंबई पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याचा मी प्रयत्न करेन, यामध्ये मला अधिकारी, कर्मचारी आणि कॉन्स्टेबल सर्वांचेच सहकार्य मिळेल असा मला विश्वास आहे असे हेमंत नगराळे यांनी सांगितले. हेमंत नगराळे १९८७ आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. 

"महाराष्ट्र व मुंबई पोलिसांवर कोणतीही टीका होणार नाही, यासाठी सर्वांच्या सहकार्याने सुधारणा करायच्या आहेत. कुठल्याही गुन्ह्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग ही शोभणारी गोष्टी नाही, ज्यांचा अशा गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे, त्यांची चौकशी सुरु आहे.  हा तपास योग्य दिशेने सुरु आहे. दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल" असे नव्या पोलीस आयुक्तांनी सांगितले. त्यांनी सर्व पत्रकारांना अतिशयोक्ती वाले प्रश्न विचारू नका. सध्या तपास सुरू असलेल्या कारवाई बाबत बोलणं योग्य होणार नाही, असं सांगितलं. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com