हृदयस्पर्शी! मुंबई पोलिसांचा Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील

मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय...
हृदयस्पर्शी! मुंबई पोलिसांचा Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या दीड वर्षापासून राज्यासह देशभरात दिसून येतोय. कोरोनाच्या (Coronavirus) भीतीने लॉकडाउन लागल्यामुळे आता वर्क फ्रॉम होम (Work From Home) ही नवी संस्कृती हळूहळू जनसामान्यांमध्ये रूजू लागली आहे. पण काही कर्मचारी हे घरात बसून काम करूच शकत नाहीत. मूळ ठिकाणावर जाऊनच त्यांना आपलं कर्तव्य (On Duty) बजावावं लागतं. त्यातीलच एक म्हणजे पोलीस (Police). गेल्या दीड वर्षात पोलिसांवर प्रचंड ताण आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या अतिउत्साहींवर लक्ष ठेवण्यापासून ते एखाद्या गरजूला वेळेत रूग्णालयात पोहोचवण्यापर्यंत सर्वच कामं पोलीस कर्मचारी करत आहेत. आपलं कर्तव्य चोख बजावताना काही पोलिसांना आपल्या प्राणाची बाजी लावावी लागली. मुंबई पोलिस (Mumbai Police) दलातील अशा ११८ पोलिसांना व्हिडीओच्या (Emotional Video) माध्यमातून सलाम करण्यात आला आहे. (Mumbai Police emotional video tribute to martyrs who made the ultimate sacrifice for Mumbaikars family)

हृदयस्पर्शी! मुंबई पोलिसांचा Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील
मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 500 दिवसांवर

मुंबई पोलिसांच्या ट्वीटर हँडलवर हा अधिकृत व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओच्या सुरूवातीला काही पासपोर्ट आकाराचे फोटो दिसतात आणि मागून आवाज येतो की ... "तुम्हाला माहित्ये का या सर्व जणांमध्ये एक समान धागा कोणता... हे सारे जण तुमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. हे आहेत मुंबई पोलिस.... तुम्ही यांना ओळखत नसाल कारण हे कायम पडद्यामागून आपली भूमिका बजावतात... या सगळ्यांचे कोविडमुळे कर्तव्य बजावत असताना निधन झालंय. तुम्ही आणि तुमचं कुटुंब सुरक्षित राहावं यासाठी या लोकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. हाच आहे परिवार, कुटुंब या गोष्टींचा अर्थ... आपल्या माणसांची सुरक्षा करणं. जे आपल्यासाठी जीव देऊ शकतात, ते आपले 'सख्खे'-सोबती नाहीत तर मग कोण असतील.... म्हणूनच घरात राहा, सुरक्षित राहा."

पाहा व्हिडीओ-

हृदयस्पर्शी! मुंबई पोलिसांचा Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील
ऑक्सिमीटर विकत घेताय..?? मग त्याआधी ही बातमी वाचाच

हा व्हिडीओ पोस्ट केल्यापासून त्याला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. "मी तुझ्यासाठी जीवही देऊ शकतो हे खूप जण म्हणतात. पण हे वचन पाळणारे काही मोजकेच असतात. आपल्या मुंबईसाठी कोविडशी लढताना हौतात्म्य पत्करणाऱ्या या शहिद पोलिस कर्मचाऱ्यांना सलाम!!", असा एक संदेशही या व्हिडीओसोबत देण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे नक्कीच पाणावतील...

हृदयस्पर्शी! मुंबई पोलिसांचा Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Video: गोरेगावच्या कोविड सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांचा डान्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com