कंगनाच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा समन्स जारी

पूजा विचारे
Thursday, 21 January 2021

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला पुन्हा एकदा मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात आला आहे.

मुंबईः  बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला पुन्हा एकदा मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात आला आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या अडचणी आता वाढतच चालल्या आहेत. कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी तक्रार केली आहे. याप्रकरणीच मुंबई पोलिसांनी तिला समन्स बजावला आहे. जावेद अख्तर यांनी कंगनानं मानहानी केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. त्यामुळे कंगनाची या प्रकरणी चौकशी होणार आहे.

डिसेंबर 2020 मध्ये जावेद अख्तर यांनी अंधेरी कोर्टात कंगनाच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. कंगनानं एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तरच्या प्रतिमेला दुखवणार्‍या काही गोष्टी केल्या असल्याचा आरोप केला जात आहे.

जावेद अख्तर यांनी मुंबई पोलिसात अभिनेत्रीविरोधात तक्रार दिली आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कंगनाला समन्स बजावला असून तिला २२ जानेवारीला जुहू पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितलं आहे.  जुहू पोलिस या प्रकरणाचा तपास करणार असून कंगनाची चौकशी केली जाणार आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

डिसेंबर 2020 मध्ये कोर्टाने जुहू पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर 16 जानेवारीला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र 16 जानेवारीला पोलिसांनी तपासाचा अहवाल सादर करण्यासाठी अधिक वेळ मागितला. त्यानंतर कोर्टाने हा अहवाल 1 फेब्रुवारीपर्यंत देण्यास मुदतवाढ दिली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे? 

प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी कंगना राणावत विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. कंगनाने विविध मुलाखतीत आपली बदनामी केली, असा दावा जावेद अख्तर यांनी केला. त्यांनी कंगना विरोधात अंधेरी कोर्टात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता.

हेही वाचा- 'अर्णब गोस्वामी व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणावर भाजपने तांडव सोडा, पण भांगडाही केला नाही'

दरम्यान आज कंगनाचं ट्विटर अकाउंट तात्पुरतं प्रतिबंधित करण्यात आलं होतं. #SuspendKanganaRanaut हा हॅशटॅग देखील ट्विटरवर ट्रेंड होत होता. 

Mumbai Police issued summons Kangana Ranaut Javed Akhtar filed a complaint


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Police issued summons Kangana Ranaut Javed Akhtar filed a complaint