धारावीत पोलिसांची छापेमारी, जप्त केलं अडीच कोटींचं हेरॉईन

अनिश पाटील
Thursday, 15 October 2020

सध्या ड्रग्स प्रकरण गाजतंय. अशात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात छापेमारी सुरु आहे.

मुंबई, ता. 15 : सध्या ड्रग्स प्रकरण गाजतंय. अशात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात छापेमारी सुरु आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने धारावी येथे सापळा रचून सव्वा किलो हेरॉईन जप्त केले आहे. धारावीतून जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे अडीच कोटी रुपये आहे. याप्रकरणी एका सराईत तस्कराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

महत्त्वाची बातमी : सिनेमागृह कधी सुरु होणार? मल्टिप्लेक्स मालकांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर कक्षाचे पोलिस निरीक्षक शशांक शेळके सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल खैरे व पोलिस पथकाला घाटकोपर येथे एक सराईत आरोपी ड्रग्स घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, धारावी येथील 60 फुट रोड परिसरातील अखिल भारतीय कुंचे-कोरवे नगर येथे सापळा रचण्यात आला होता.

त्यावेळी सत्तेचाळीस वर्षीय संशयीत मनझार दीन मोहम्मद शेख तेथे आला. त्यावेळी सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून एक किलो 200 ग्रॅम हेरॉईन केलेलं आहे. या हेरॉईनची किंमत तब्बल दोन कोटी 40 लाख रुपये आहे.

महत्त्वाची बातमी : सिनेमागृह कधी सुरु होणार? मल्टिप्लेक्स मालकांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

याप्रकरणी मोहम्मद शेखला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा कलम 8 (क) आणि 21 (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सराईत असून उपनगरात त्याचे तस्करीचे मोठे जाळे आहे. यापूर्वी 2018 मध्येही अमली पदार्थ विरोधीत पथकाने त्याला अटक केली होती. 

( संपादन - सुमित बागुल )

mumbai police raids in dharavi captures illegal powder worth two and half crore


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai police raids in dharavi captures illegal powder worth two and half crore