प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीसांचे "ऑपरेशन ऑल आऊट" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 mumbai police

Mumbai Police : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीसांचे "ऑपरेशन ऑल आऊट"

मुंबई : मुंबईत शहरात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्भूमीवर 24 जानेवारी ते 25 जानेवारी ऑपरेशन ऑल आऊट हे विशेष अभियान मुंबई पोलीसांकडून. दरम्यान राबविण्यात आले. मुंबई शहरातील सर्व 5 हि प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त तसेच अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, 14 परिमंडळीय पोलीस उप आयुक्त, पोलीस उप आयुक्त विशेष शाखा / सुरक्षा, 28 विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी एकत्रित सर्व मुंबई शहरात ऑल आऊट वी कार्यवाही केली.

अभियाना दरम्यान केलेली कारवाई

• मुंबई पोलीसांच्या रेकॉर्डवरील 51 पाहिजे/ फरारी आरोपीतांना अटक करण्यात आले आहे.

• एकुण 100 अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करून आरोपीतांना अटक करण्यात आली.

• अंमली पदार्थ खरेदी / विक्री करणाऱ्या इसमांवर अंमली पदार्थ विरोधी कायदा अन्वये एकुण 139 कारवाया करण्यात आल्या.

• अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीवर एकुण 41 कारवाया करण्यात आल्या असून त्यात चाकू, तलवारी इ. शस्त्रे जप्त करण्यात आली.

• अवैध दारू विक्री / जुगार इ. अवैध धंदयांवर 70 ठिकाणी छापे टाकून, अवैध धंदे समूळ उध्वस्त करण्यात आले. त्यादरम्यान 55 आरोपीतांस अटक करण्यात आली.

• मुंबई शहराबाहेर तडीपार केलेले, परंतु मुंबई शहरात विना परवाना प्रवेश केलेल्या तडीपार आरोपींना अटक करण्याचे अनुषंगाने एकूण 42 कारवाया करण्यात आल्या.

• महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम 120, 122 व 135 अन्वये संशयितरित्या वावरणारे इसमांवर एकुण 114 कारवाया करण्यात आल्या आहेत.

• त्याचप्रमाणे अनधिकृत फेरीवाल्यांवर एकुण 331 कारवाया करण्यात आल्या.