esakal | दादरमध्ये मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Two-Arrested-Remdesivir

माहिती मिळताच सापळा रचून दोघांना केली अटक

दादरमध्ये मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) दोन महिन्यांपूर्वी करोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउनचा (Maharashtra Lockdown) आधार घेण्यात आला आहे. त्याशिवाय, ऑक्सिजनचा (Medical Oxygen) पुरेसा पुरवठा, रेमडेसिव्हिर (Remdesivir) आणि इतर वैद्यकीय सेवा वेळेवर देण्याचाही सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे. कोरोनासंबंधित औषधांची साठेबाजी (Stock) केल्यास गंभीर कारवाई करण्यात येईल असं शासनाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. असे असूनही काही लोक रेमडेसिव्हिरची साठेबाजी व काळाबाजार (Black Marketing) करत आहेत. अशा लोकांवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आज महत्त्वपूर्ण कारवाई केली. (Mumbai Police seized 5 Remdesivir Injections 2 people arrested in Dadar for black marketing)

हेही वाचा: "...म्हणून मराठा बांधवांना ठाकरे सरकारची चिड"

मुंबईतील दादरच्या कुबतरखाना परिसरात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ५ कडून ही कारवाई करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपचाराकरता अतिआवश्यक असलेल्या रेमडेसिव्हिरच्या इंजेक्शनची विक्री छापील किंमतीपेक्षा जास्त दराने करत असलेल्या दोघांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. रेमडेसिव्हिरचा काळा बाजार करणाऱ्यांवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 5 ची ही मोठी कारवाई मानली जात आहे. हे दोघे रेमडेसिव्हिरची काळ्या बाजारात 25 हजारांना विक्री करत होते. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्या दोघांना अटक केली आणि त्यांच्याकडून एकूण 5 रेमडेसिव्हिर इंजेक्शन्स जप्त करण्यात आली. या संदर्भात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा: भिवंडीमधुन १२ हजार जिलेटिन कांड्या आणि ३ हजार डिटोनेटर्स जप्त

अशी करण्यात आली कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा कक्ष ५ ला सोमवारी या संबंधीची माहिती मिळाली. रेमडेसिव्हिरची मूळ किमतीच्या अंदाजे ५ ते ६ पट जास्त जास्त दराने विक्री केली जात होती. या माहितीच्या आधारावर दादरच्या कबुतरखाना परिसरात एम. सी. जावळे मार्गावर पोलिसांनी सापळा रचला. एक इसम रेमडेसिव्हिरची इंजेक्शन्स २५ हजारांना विकत असल्याचे समजले. त्या पोलिसांना लगेच ताह्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी आणखी एकाला ताब्यात घेतले.