मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण संपन्न

दिनेश चिलप मराठे
Saturday, 23 January 2021

शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज मुंबईतील डॉक्टर शामाप्रसाद मुखर्जी चौकात उदघाटन करण्यात आलं.

मुंबई : शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबईतील डॉक्टर शामाप्रसाद मुखर्जी चौकात उदघाटन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सर्व मान्यवर उपस्थित होते. यासह मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे,  हे देखील उपस्थित होते.

महाराष्ट्रातील शिवसैनिकांचे दैवत असलेल्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 9 फुट उंच पुतळयाचे आज डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी चौक कुलाब्यात झालं. संध्याकाळी 6:15 वाजता हे उदघाटन करण्यात आलं. २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असते. त्याचेच अवचित्य साधून आज बाळासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला.

20% राजकारण आणि 80% समाजकारण

19 जून 1968 साली बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी 20% राजकारण आणि 80% समाजकारण करणारी शिवसेना संघटना स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या  दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर लाखोंच्या जनसागराला संबोधन करणाऱ्या सभा मुंबईकरांसह देशाने पाहिल्यात आणि अनुभवल्या देखील. 

मुंबई महानगर महापालिकेनं जी जागा निश्चित केली होती तिला स्थानिकांनी विरोध केल्यामुळे कुलाबा येथील डॉक्टर शामाप्रसाद मुखर्जी चौकात अखेर जागा निश्चित करण्यात आली. आज सर्व सोपस्कार पूर्ण करुन, नवीन परवानग्या घेऊन काम पूर्णत्वास नेण्यात आलं. मागील 23  जानेवारीला काम अपूर्ण असल्यामुळे उदघाटन होऊ शकले नाही. त्यांनतर सर्व भारतात आणि जगात कोरोनाचे संकट उभं राहिले होते. त्याला तोंड देत वर्ष सरलं आणि अखेर या वर्षात बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीला मुहूर्त सापडला आहे.

सुप्रसिद्ध शिल्पकार शशिकांत फडके यांनी आपले पूर्ण कौशल्य पणाला लावून हा पुतळा घडविला आहे. जोगेश्वरी येथील मातोश्री क्लब येथे पुतळयाला घडविण्यात आले आहे.आता हा पुतळा डॉक्टर शामाप्रसाद प्रसाद मुखर्जी चौकात चौथऱ्यावर उभा करण्यात आला आहे.

पुतळ्याचा चेहरा हा मंत्रालयाच्या दिशेने तर पाठ वास्तु संग्रहालयाच्या दिशेने

'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो' असे मनाचा ठाव घेणारे दिवंगत बाळा साहेबांचे  सभेत भाषणाची सुरुवात करताना श्रोतयांना साद घालणारी ओळ कोरण्यात आलेले असून या पुतळ्याचा चेहरा हा मंत्रालयाच्या दिशेने तर पाठ वास्तु संग्रहालयाच्या दिशेने करण्यात आलेली आहे. आपल्या भाषणाचा शेवट करताना बाळासाहेब ठाकरे जे शब्द उच्चारत असत ते शब्द म्हणजे 'जय हिंद जय महाराष्ट्र' हे सुद्धा या पुतळ्याच्या खाली असलेल्या चौथऱ्यावर कोरण्यात आलेले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा हा बाराशे किलो ब्रॉन्झ धातू वापरून साकारण्यात आलेला आहे.

Mumbai Political News Full Statue Of Shivsena Chief Balasaheb Thackeray Inaugurated At Colaba

-----------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Political News Full Statue Of Shivsena Chief Balasaheb Thackeray Inaugurated At Colaba