"अटक करा, अटक करा, अर्णब गोस्वामी याला अटक करा..." घोषणांनी मुंबईचं वातावरण तापलं

सुमित बागुल
Thursday, 21 January 2021

देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढणार्‍या अर्णब  गोस्वामी यांच्याविरोधात देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई, ता. 21:  "गली गली मे शोर है, अर्णब गोस्वामी चोर है... ", "अटक करा, अटक करा, अर्णव गोस्वामी याला अटक करा..." अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने अर्णब  गोस्वामी यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले.

देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढणार्‍या अर्णब  गोस्वामी यांच्याविरोधात देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसनेही अर्णब  गोस्वामी याला अटक करण्यासाठी आणि देशाची गोपनीय माहिती देणार्‍या व्यक्तीचे नवे जाहीर करावे यासाठी आज त्यांच्या रिपब्लिक टिव्हीच्या मुंबई येथील कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. 

मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Marathi News From Mumbai and Suburbs

दरम्यान, अर्णब गोस्वामी यांना गोपनीय माहिती मिळाली आणि त्यांनी त्याचा चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी उपयोग केला, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करावी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी यावर खुलासा करावा अशी मागणी माजी आमदार विद्या चव्हाण यांनी केली. तर राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी अर्णब  गोस्वामी याला ही गोपनीय माहिती कुणी पुरवली याची माहिती उघड करावी अशी मागणी माध्यमांशी बोलताना केली. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार विद्या चव्हाण, राष्ट्रवादीचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष अमोल मातेले यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

mumbai political news NCP agitation against republic tv editor arnab goswami  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai political news NCP agitation against republic tv editor arnab goswami