लॉकडाऊन काळात मुंबईच्या प्रदूषणात वाढ; अभ्यासातील निष्कर्ष

लॉकडाऊन काळात मुंबईच्या प्रदूषणात वाढ; अभ्यासातील निष्कर्ष तौक्तेसारख्या वादळांमुळे वातावरण स्वच्छ होण्यास मदत होत असल्याचे तज्ज्ञांचे मत Mumbai Pollution level Increased even during lockdown Concludes study
लॉकडाऊन काळात मुंबईच्या प्रदूषणात वाढ; अभ्यासातील निष्कर्ष

तौक्तेसारख्या वादळांमुळे वातावरण स्वच्छ होण्यास मदत होत असल्याचे तज्ज्ञांचे मत

मुंबई: कोरोनामुळे (Covid 19) लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे 2020 आणि 2021 या वर्षात देशभरातील हवेची गुणवत्ता सुधारली असली, तरीही क्लायमेट ट्रेण्ड्सने केलेल्या अभ्यासानुसार मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. मुंबईच्या वातावरणातील पीएम 2.5 चे प्रमाण मार्च, एप्रिल आणि मे या कालावधीत वाढत असल्याचे चित्र दरवर्षी दिसत आहे. तसेच लखनऊ आणि दिल्ली येथे प्रदूषण पातळी ही अपेक्षित मर्यादेपेक्षा अधिक दिसून आली. कोलकाता येथे मात्र 2019 ते 2021 या काळात मार्च, एप्रिल, मे या कालावधीत हवेचा दर्जा सुधारला असल्याचे अभ्यासादरम्यान स्पष्ट झाले आहे. (Mumbai Pollution level Increased even during lockdown Concludes study)

‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांतील हवा गुणवत्ता आकडेवारीच्या आधारे मुंबई, दिल्ली, लखनऊ आणि कोलकाता या शहरांतील टाळेबंदीपूर्वीची 2019 सालची हवा गुणवत्ता व 2020, 2021 या टाळेबंदीच्या वर्षांतील हवा गुणवत्ता यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. अभ्यासातील निष्कर्षानुसार मुंबई वगळता इतर शहरांमध्ये पीएम 2.5 च्या सरासरीमध्ये 2020 या वर्षात घट दिसून आली.

लॉकडाऊन काळात मुंबईच्या प्रदूषणात वाढ; अभ्यासातील निष्कर्ष
तुम्हाला AC लोकल का हवी? मध्य रेल्वेने सुरु केला सर्वे

मुंबईतील पीएम 2.5 चे सरासरी प्रमाण मार्च ते मे 2019 या काळात 21.6 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर (ug/m3)  होते. त्यात वाढ होऊन 2020 साली हे प्रमाण 31.3 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर व 2021 मध्ये 40.3 मायक्रोग्रॅम प्रतिघननीटरपर्यंत गेले. ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या निर्देशानुसार पीएम 2.5 चे सुरक्षित प्रमाण 40 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर आहे.

मुंबई समुद्रकिनारी वसलेली असल्याने येथील स्थानिक वातावरण आणि वादळांमुळे सार्वत्रिक वातावरणात होणारे मोठे बदल यांचा एकत्रित परिणाम येथे जाणवतो. वाऱ्याचा वेग कमी असल्यास निर्माण होणाऱ्या अनुकूल स्थितीमुळे शेजारच्या राज्यांतून येणारी प्रदूषके वातावरणात जमून रहातात; मात्र तौक्तेसारख्या वादळांमुळे वातावरण स्वच्छ होण्यास मदत होते.

- प्रा. एस. के. ढाका, राजधानी महाविद्यालय, दिल्ली विद्यापीठ

लॉकडाऊन काळात मुंबईच्या प्रदूषणात वाढ; अभ्यासातील निष्कर्ष
बोगस डॉक्टरने केल्या हजार शस्त्रक्रिया; 'असा' झाला पर्दाफाश

दिल्लीतील पीएम 2.5 चे तीन महिन्यांचे सरासरी प्रमाण 2019 साली 95.6 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर होते. त्यात घट होऊन हे प्रमाण 2020 साली 69 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर इतके आढळले; पण 2021 साली पुन्हा हे प्रमाण 95 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपर्यंत वाढले. याचप्रमाणे, कोलकात्यामध्येही पीएम 2.5 चे प्रमाण 2019 साली 41.8 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर होते व 2020 साली ते 27.9 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपर्यंत घटले. 2021 साली पुन्हा वाढ होऊन हे प्रमाण 37.3 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर झाले.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पीएम 2.5 चे प्रमाण 2019 पासून सातत्याने घटत आहे; मात्र अजूनही हे प्रमाण अपेक्षित मर्यादेपेक्षा अधिकच आहे. लखनऊमध्ये मार्च, एप्रिल, मे या कालावधीतील पीएम 2.5 चे प्रमाण 2019 साली 103 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर होते. त्यात घट होऊन ते 2020 साली 92 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपर्यंत खाली आले. 2021 साली ते आणखी कमी होऊन 79.6 मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपर्यंत खाली आले.

लॉकडाऊन काळात मुंबईच्या प्रदूषणात वाढ; अभ्यासातील निष्कर्ष
"१५ ऑगस्टपर्यंत दि बा पाटील यांचे नाव द्या, अन्यथा..."

2020 आणि 2021 मध्ये टाळेबंदीमुळे वाहनांची वर्दळ कमी झाली. परिणामी, इंधनाचा वापरही कमी झाला. टाळेबंदीत औद्योगिक आस्थापनाही बंद राहिल्या; मात्र तरीही यावर्षी प्रदूषणाचे प्रमाण अद्याप जास्तच आहे. 2017 नंतर पीएम 10 च्या प्रमाणात घट होताना दिसत आहे ही समाधानाची बाब आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पीएम 2.5 आणि पीएम 10 चे सर्व प्रदेशांतील प्रमाण यावर्षी अधिकच दिसून येत आहे.

- डॉ. जी. सी. किस्कू, प्रमुख शास्त्रज्ञ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टॉक्सिकोलॉजी रिसर्च (CSR)

प्रदूषणाचे बरेचसे स्रोत थांबलेले असताना देशाच्या मूळ वातावरणाचा अभ्यास करण्याची संधी 2020 सालात लागू झालेल्या अभूतपूर्व टाळेबंदीमुळे प्रथमच मिळाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एकूण 8 प्रदूषण स्रोतांपैकी बांधकाम, औद्योगिक कामे, वीटभट्ट्या आणि वाहने हे 4 स्रोत पूर्णत: बंद होते. घरगुती वायू, आग, डिझेल निर्मिती, धूळ, कोळशावरील विद्युतनिर्मिती केंद्रे हे स्रोत कमी क्षमतेने सुरू होते. 2021 साली टाळेबंदी पूर्णत: लागू नसल्याने दोन्ही वर्षांचा तुलनात्मक अभ्यास करणे शक्य झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com