Mumbai Pollution: मुंबईचे प्रदूषण पुन्हा वाढले; 'या' ठिकाणची हवा सर्वात खराब

Mumbai Pollution
Mumbai Pollutionsakal

Mumbai Pollution: कुर्ला कॉम्प्लेक्स, चेंबूर, कुलाबा, मालाड, खेरवाडी, बोरीवली, शिवडी, चेंबूर येथील सर्वाधिक खराब हवेची आज नोंद झाली आहे. येथे वाढते प्रदूषण लक्षात घेऊन महापालिकेने खबरदारी घेतली आहे. या ठिकाणचा एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) २०० हून जास्त असल्याने हवा खराब आहे. खराब हवेचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे.

मुंबईतील हवेचा दर्जा खालावला आहे. काहींना सर्दी, खोकला तसेच श्वसनाचा त्रास जाणवतो आहे. मुंबईतील हवेचा गुणवत्ता तपासण्यासाठी सफर संस्था आणि पालिकेच्या माध्यमातून एअर क्वालिटी इंडेक्स तपासण्यासाठी यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. यानुसार ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ (एक्यूआय) तपासला जातो. यामध्ये ० ते ५० पर्यंत ‘एक्यूआय’ ‘अतिशय शुद्ध हवा’ मानली जाते.

Mumbai Pollution
Mumbai Pollution: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; हवेतील प्रदूषण झाले कमी!

५१ ते १०० दरम्यान ‘एक्यूआय’ - ‘समाधानकारक हवा’, १०१ ते २०० दरम्यान ‘एक्यूआय’ ‘मध्यम दर्जाची हवा’, २०१ ते ३०० पर्यंत ‘एक्यूआय’- ‘खराब’ हवा समजली जाते. तर ३०१ ते ४०० ‘एक्यूआय’ - ‘अतिशय खराब’ तर ४०१ ते ५०० ‘एक्यूआय’ असल्यास ‘हवेची स्थिती गंभीर’ असल्याचे मानले जाते. सद्यस्थितीत वांद्रे - कुर्ला कॉम्प्लेक्स, चेंबूर, कुलाबा, मालाड, खेरवाडी, बोरीवली, शिवडी, चेंबूर या ठिकाणचा एक्यूआय जास्त असल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे पालिका सतर्क झाली असून त्या ठिकाणी उपाययोजना केल्या जात असल्याचे पालिकेने सांगितले.

बांधकामे सील करण्याची कारवाई

सद्या स्कॉडच्या माध्यमातून प्रदूषणाचे नियम पाळले जात आहेत हे पाहण्यासाठी तपासणी केली जाते आहे. बांधकामे आदी कामांच्या ठिकाणी नियम मोडल्याचे समोर आल्यास स्टॉप वर्क नोटीस, बांधकाम ठिकाण सील करणे अशी कारवाई केली जाऊ शकते असा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Mumbai Pollution
Mumbai Pollution: प्रदूषणमुक्त दिवाळीची ऐशी की तैशी : मुंबईकरांनी फोडले तब्बल ५०० कोटींचे फटाके!

हवेतील प्रदूषणाची नोंद (एक्युआय) - छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट - १२५ विलेपार्ले वेस्ट - १३२ बोरिवली - पूर्व - १०१ वरळी - १११ सायन - १७० माझगाव - १५७ चकाला - अंधेरी पूर्व - १९४ भांडुप - १६० कांदिवली - ७७ मुलुंड - १२० घाटकोपर -

Mumbai Pollution
Mumbai Air Pollution : बिघडलेल्या हवेचे करायचे काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com