मुंबईचा positivity रेट 2.5 टक्क्यांवर पण 'ही' ठरतेय चिंतेची बाब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai corona Virus Updates

मुंबईचा Positivity रेट 2.5 टक्क्यांवर पण 'ही' आहे चिंतेची बाब

मुंबईचा रुग्णवाढीचा दर कमी होऊनही मुंबई तिसऱ्या लेव्हलमध्येच

मुंबई: राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत मुंबईचा (Mumbai) पॉझिटिव्हीटी रेट (Positivity Rate) वेगाने घसरत असून 2.5 पर्यंत खाली आला आहे. मात्र मुंबई शहराला लागून असलेल्या ठाणे, रायगड जिल्ह्यात मात्र पॉझिटिव्हीटी रेट अधिक आहे. गेल्या आठवड्यात मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट 5.56 % च्या आसपास होता. दोनच दिवसांपूर्वी त्यात कमालीची घट होऊन पॉझिटिव्हीटी रेट 4.40 %पर्यंत खाली आला होता. शनिवारी तर त्यात आणखी घट होऊन तो 2.5 इतका झाला आहे. पण ठाणे आणि रायगड परिसरातील अनेक लोक कामासाठी रोज मुंबईत येतात, त्यामुळे त्यांच्या रूग्णवाढीचा दर हा मुंबईसाठी चिंतेची बाब ठरत आहे. (Mumbai positivity rate going down but thane raigad Covid 19 status is matter of concern)

रुग्णसंख्या झपाट्याने कमी असल्याने मुंबईतील रिक्त आयसोलेशन बेड्स ची संख्या ही वाढत आहे. मुंबईत सध्या 21 हजाराहून अधिक आयसोलेशन बेड्स उपलब्ध आहेत. 8,534 ऑक्सिजन बेड,1000 आयसीयू बेड तर 389 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत. राज्यातील आठवड्याभरातील पॉझिटिव्हीटी रेट हा 5.8 % आहे. कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली, ठाणे, औरंगाबाद येथील पॉझिटिव्हीटी रेट हा अधिक आहे. गेल्या दोन आठवड्यापासून या जिल्ह्यांतील पॉझिटिव्हीटी रेट कमी होत आहे मात्र कोल्हापूर याला अपवाद आहे. गेल्या दोन आठवड्यात 29 मे ते 9 जून पर्यंत कोल्हापूर मधील पॉझिटिव्हीटी रेट 16.6 % आहे. हा राज्यातील सर्वाधिक पॉझिटिव्हीटी रेट आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. असे असले तरी बाधित रुग्ण 2 ते 3 आठवड्यानंतर दगावत आहेत. मुंबईतील मृत्यु नियंत्रणात असले तरी महामुंबईत मृत्यु होतच आहेत. पण जशी रुग्णसंख्या कमी होत जाईल त्या प्रमाणात मृत्यू ही कमी होतील.

-डॉ.अविनाश सुपे , प्रमुख , राज्य मृत्यू परीक्षण समिती