esakal | नवी मुंबईच्या झुंजारे कुटुंबियांवर काळाचा घाला, ११ वर्षांच्या अर्णवनं गमावले आई-वडील
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईच्या झुंजारे कुटुंबियांवर काळाचा घाला, ११ वर्षांच्या अर्णवनं गमावले आई-वडील

नवी मुंबई महापालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंजारे याच्यासह त्यांच्या कुटुंबातील 4 जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नवी मुंबईच्या झुंजारे कुटुंबियांवर काळाचा घाला, ११ वर्षांच्या अर्णवनं गमावले आई-वडील

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई:  मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर रात्री 12 वाजून 30 मिनिटांनी झालेल्या अपघातात नवी मुंबई महापालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंजारे याच्यासह त्यांच्या कुटुंबातील 4 जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहिती नुसार पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गांवर ब्रेक निकामी झालेल्या ट्रेलर चालकाचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटल्याने हा आपघात घडला. ट्रेलरने पुढील 4 वाहनांना धडक दिल्याने 5 जण ठार तर 5 जण जखमी झाले आहेत. 

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खालापूर टोल नाक्याजवळ झालेल्या या अपघातातील काही जण लग्नासाठी पुण्याला गेले होते. पुण्याहून परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.

झुंजारे कुटुंबियांसाठी काळरात्र

या अपघातात नवी मुंबईतील झुंजारे कुटुंबियांसाठी काळरात्र ठरली आहे. झुंजारे कुटुंबातील ४ जणांचा एकाचवेळी मृत्यू झाला आहे. नवी मुंबई मनपा अधिकारी वैभव झुंजारे यांचा त्यांच्या कुटुंबातील इतर 3 जणांसह मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वैभव यांचा ही मृत्यू झाला आहे. त्यात त्यांची आई उषा झुंजारे पत्नी वैशाली झुंजारे आणि पाच वर्षांची मुलगी श्रिया झुंजारे यांचा मृत्यू झाला आहे.

अपघातातील मृतांची नावे

  • डॉ. वैभव वसंत झुंजारे , वय ४१, नेरुळ, नवी मुंबई
  • उषा वसंत झुंजारे , वय ६३, नेरुळ, नवी मुंबई
  • वैशाली वैभव झुंजारे , वय ३८, नेरुळ, नवी मुंबई
  • श्रिया वैभव झुंजारे, वय ५, नेरुळ, नवी मुंबई
  • मंजू प्रकाश नाहर, वय ५८, गोरेगाव

अपघातातील जखमी

स्वप्नील सोनाजी कांबळे, ३० वर्षे,गोरेगाव
प्रकाश हेमराज नाहर, वय-६५, गोरेगाव
अर्णव वैभव झुंजारे, वय-११, नेरुळ, नवी मुंबई
किशन चौधरी, (गंभीर जखमी)
काळूराम जमनाजी जाट *(गंभीर जखमी)

अपघाताची माहिती मिळताच एक्सप्रेस वेवरील सर्व यंत्रणा, खोपोली पोलिस, खोपोली अपघातांच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते आणि अन्य यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन मदत करण्यात आली. या संदर्भात खोपोली पोलिस पुढील तपास करत आहेत.

mumbai pune express highway accident navi mumbai jhunjare family 4 people died

loading image
go to top