Mumbai : 25 वर्षे फरारी असलेला सराईत गुंडाला जेरबंद करण्यात रफी अहमद किदवाई मार्ग पोलिसाना यश

आरोपी आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात जामिनावर गेल्या 25 वर्षांपासून फरार होता.
Crime News
Crime Newssakal

मुंबई - रफी अहमद किडवई आरएके मार्ग पोलिस पोलिसांनी गुरुवारी 25 वर्ष फरार असलेल्या एका 62 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. अहमद अली पटेल असे आरोपीचे नाव असून त्याला आरएके मार्ग पोलिसांनी गुजरातच्या भरूच जिल्यातील आमोद येथून अटक केली आहे.

आरोपी आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात जामिनावर गेल्या 25 वर्षांपासून फरार होता. गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील आमोद तालुक्यात स्थायिक झालेला आरोपी अहमद अली पटेल याने स्वप्नातही पाहिले नव्हते की मुंबई पोलीस इतक्या वर्षांनंतर त्याचा शोध घेईल,

विशेषत: त्यांच्याकडे त्याचा फोटो किंवा पत्ता नसताना.परंतु रफी अहमद किडवई मार्ग पोलिसांनी अशक्यास शक्य केले.

साल 1998 मध्ये, आरोपीने दादरमधील फोटो क्लिप इंडिया लिमिटेड या कंपनीकडून 40 कॅमेरे मागवले होते. याचा मोबदला आरोपीने बँक ऑफ सौराष्ट्रच्या मालाड शाखेच्या नावे 50000 च्या चेकने दिला.

परंतु चेक वठला नाही परिणामी पिडीत व्यक्तीने चौकशी केली असता त्यांना कळले की बँक ऑफ सौराष्ट्रची मालाडमध्ये शाखा नाही. शेवटी आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली.

फरार घोषित

पोलिसांकडून आरोपी पटेल याला फसवणूकी प्रकरणी अटक करण्यात आली होती तसेच जनक ढोलकिया नावाच्या त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली होती. कालांतराने कोर्टात त्यांचा अटी शर्थी सह जामीन मंजूर झाला.

जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी कोर्टाच्या अटीचे उल्लंघन केले. त्यानंतर महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध अनेक वॉरंट जारी केले आणि अखेरीस त्याला ‘घोषित गुन्हेगार’ किंवा फरारी घोषित केले.

तपास फसला

आरोपी अहमद अली पटेल फरार झाल्यानंतर अनेक पोलिस पथके त्याला अटक करण्यासाठी गेली पण त्याने पत्ता बदलला असल्याने तो सापडला नाही. त्याचे कोणतेही छायाचित्रही पोलीस रेकॉर्डमध्ये उपलब्ध नव्हते.

तत्पूर्वी, पोलीस पथकाने सहआरोपी ढोलकियाकडून त्याचा मोबाईल नंबर मिळवला होता आणि बँक अधिकारी म्हणून दाखवून, त्याला त्याचे केवायसी अपडेट करण्यासाठी बँकेत येण्यास सांगितले.

मात्र काहीतरी गडबड असल्याचा संशय घेऊन तो घटनास्थळावरून पळून गेला. आरोपी अनेक वेळा फोन नंबर बदलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले

ऑनलाईन व्यवहारातून आरोपी ताब्यात

यावेळी पोलीस पथकाने आरोपीच्या साथीदाराकडून आरोपीचा नवीन मोबाईल नंबर घेतला. आरोपी व्हॉट्सअॅप वापरत नसल्याचे पोलिसाना तपासात समजले. तसेच पोलिसांपासून दूर राहण्यासाठी आरोपी कमी वेळा फोन वापरत होता,

मात्र पोलिसाना आढळले की त्याच्या बँकेचे युपीआई खाते फोनशी जोडलेले होते आणि एक व्यवहार खात्याद्वारे केला गेला होता. पोलिसांनी यूपीआई अॅपशी जोडलेले बँक खाते शोधले आणि बँकेतून आरोपी पटेल फोटो आणि गुजरातेतील आमोदचा पत्ता मिळवला. पोलिस पथक आमोद येथे दाखल झाले.

आमोद पोलिसांच्या मदतीने दोन दिवस पोलीस पथक त्याच्या घराजवळ सापळा रचून थांबले. शेवटी आरोपी परतल्यावर पोलिसांनी त्याला पकडले.आरोपी आमोद जिल्ह्यात एक प्रकारचे निवृत्त जीवन जगत होता तसेच शेती करत होता.

एवढ्या कालावधीनंतर पोलिस पुन्हा त्याचा शोध घेण्यासाठी येतील याची आरोपीने कल्पनाही केली नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com