Mumbai : रेल्वेची डिजिटल सिग्नल यंत्रणा कागदावरच ! अठरा हजारापेक्षा जास्त सिंग्नल...

त्यामुळे अनेक लोकल सेवांना फटका बसत असून प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. त्यामुळे रेल्वेने काही वर्षांपूर्वी सीबीटीसी (कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टम) या अत्याधुनिक डिजिटलाइज्ड सिग्नल यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
हा हॉर्न ड्रायव्हर गार्डला इंजिनचा ताबा घेण्यास संकेत देत आहे. जेव्हा एखाद्याने रेल्वेची आपत्कालीन साखळी खेचली असेल किंवा गार्डने व्हॅक्यूम ब्रेक लावला.
हा हॉर्न ड्रायव्हर गार्डला इंजिनचा ताबा घेण्यास संकेत देत आहे. जेव्हा एखाद्याने रेल्वेची आपत्कालीन साखळी खेचली असेल किंवा गार्डने व्हॅक्यूम ब्रेक लावला.

नितीन बिनेकर

Mumbai - ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या तिहेरी रेल्वे अपघातात २८८ प्रवाशांचा बळी गेला आहे. हा अपघात सिग्नलदोषामुळे झाल्याच समोर येत आहे.त्यामुळे मुंबईतील सिग्नल यंत्रणामधील दोषांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गेल्या आठ वर्षात साधरणतः १८ हजारपेक्षा जास्त वेळा तांत्रिक बिघाडाचा घटना घडल्या आहे.

त्यामुळे अनेक लोकल सेवांना फटका बसत असून प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. त्यामुळे रेल्वेने काही वर्षांपूर्वी सीबीटीसी (कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टम) या अत्याधुनिक डिजिटलाइज्ड सिग्नल यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, हा निर्णय कागदावरच आहे.

मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणजे, उपनगरीय लोकल ट्रेन म्हणून ओळखली जाते. दररोज ३ हजारपेक्षा लोकल फेऱ्यामधून मध्य -पश्चिम रेल्वे मार्गावरून साधरणतः ७० ते ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. परंतु, उपनगरीय रेल्वेच्या अनेक वेळा सिग्नल बिघाडामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

त्यामुळे मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणावर मोठा परिणाम होतो आहे. २०१४ ते २०१९ पर्यत गेल्या पाच वर्षांत मध्य रेल्वे मार्गवर १५ हजारपेक्षा जास्त वेळा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. तर, मार्च २०२०-२१ पर्यत कोव्हीड काळात लोकल फेऱ्या बंद होत्या. त्यानंतर लोकल फेऱ्या सुरु झाल्या.

२०२० ते २०२३ पर्यत साधारणता ३ हजार सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती सकाळला रेल्वेचा एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या आठव वर्षात साधरणतः १८ हजारसिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्या आहे. सिग्नल यंत्रणेत होणाऱ्या बिघाडा रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सिग्नल यंत्रणेत होणाऱ्या बिघाडाचा घटनेत घट झाली असली तरी, ओडिशाच्या तिहेरी रेल्वे अपघातानंतर मुंबईतील रेल्वेचा सिंन्गल दोषांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

डिजिट सिग्नल यंत्रणा कागदावरच ?

सध्या रेल्वेकडून मानवी पद्धतीने सिग्नल यंत्रणा हातळाताना अनेक अडचणीचा सामना रेल्वेला करावा लागतो. त्यातच अपघाताचा धोकाही शक्यात असते. सातत्याने सिग्नल यंत्रणेत बिघाड होत असल्याने लोकलचे वेळापत्रकांवर मोठा परिणाम पडतोय.

हा हॉर्न ड्रायव्हर गार्डला इंजिनचा ताबा घेण्यास संकेत देत आहे. जेव्हा एखाद्याने रेल्वेची आपत्कालीन साखळी खेचली असेल किंवा गार्डने व्हॅक्यूम ब्रेक लावला.
Pune Rain : पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात; अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

त्यामुळे काही वर्षांपूर्वी सीबीटीसी (कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टम) या अत्याधुनिक डिजिटलाइज्ड सिग्नल यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळा’कडून (एमआरव्हीसी मयूटीपी- ३ ए )अंतर्गत अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा सीबीटीसी बसविण्यात येत आहे. १ हजार ३९१ कोटींचा खर्च अपेक्षित आहेत.

परंतु सध्या हा प्रकल्प कागदावरच आहे. त्यामुळे उपनगरीय लोकलचा प्रवास सुरक्षित आणि जलदगतीने व्हावा यासाठी रेल्वेने तात्काळ प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. यांसंदर्भात एमआरव्हीसीचा अधिकाऱ्यांना विचारना केली असताना. त्यांनी सांगितले की, यासंदर्भातील माहिती घेऊन देतोय.

हा हॉर्न ड्रायव्हर गार्डला इंजिनचा ताबा घेण्यास संकेत देत आहे. जेव्हा एखाद्याने रेल्वेची आपत्कालीन साखळी खेचली असेल किंवा गार्डने व्हॅक्यूम ब्रेक लावला.
Pune News: पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार! पाण्याच्या टँकरची खासगी ठिकाणी विक्री? स्थानिक आक्रमक

काय आहे सीबीटीसी... ?

सीबीटीसी प्रकल्प मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते कल्याण, पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार आणि हार्बरवरील सीएसएमटी ते पनवेल या मार्गावर राबविण्यात येणार आहे.ही सिग्रल यंत्रणा डिजिटल आहे. यात मोटरमनला बसल्या जागी वेगासंबंधात नियंत्रण कक्षाकडून सिग्नलद्वारे झटपट सूचना मिळतात. तसेच, पुढे असलेल्या लोकल संदर्भातही सिग्रल मिळेल. यामुळे लोकल वेळेत धावतील.

हा हॉर्न ड्रायव्हर गार्डला इंजिनचा ताबा घेण्यास संकेत देत आहे. जेव्हा एखाद्याने रेल्वेची आपत्कालीन साखळी खेचली असेल किंवा गार्डने व्हॅक्यूम ब्रेक लावला.
Mumbai : लालबागच्या यशोमंगल सोसायटीत म्हाडाची घुसखोरी; म्हाडाने ठराव रद्द न केल्यास कोर्टात जाणार, सोमवारी नागरिकांचे साखळी उपोषण

वर्ष -सिग्नल बिघाडाची संख्या

२०१४-१५ -३७७८

२०१५-१६ -३२४६

२०१६-१७ -२९०३

२०१७-१८ -२६०९

२०१८-१९ -२५९३

२०१९-२० - १७३२

२०२०-२१ - कोव्हीड

२०२१-२२ - अंदाजी २०००

एकूण = १८,८६०

प्रतिक्रिया-

ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताची दुर्देवी घटना लक्षात घेऊन, रेल्वेने मुंबई विभागातील सिग्नल यंत्रणेत अपग्रेट करावेत.जेणेकरून अशी दुर्घटना मुंबईत होणार नाहीत.

सुभाष गुप्ता,अध्यक्ष, रेल यात्री परिषद

रेल्वे सेवेला फटका -

मध्य रेल्वेवर दररोज रोज सुमारे १८१० लोकल फेर्‍या चालविल्या जातात. ज्यामध्ये मध्य मार्ग ८९४, हार्बर मार्ग६१६, ट्रान्स हार्बर २६२ आणि बेलापूर-खारकोपर ४०अ सा समावेश आहेत. मात्र रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाडामुळे अनेकदा या लोकल सेवा फटका बसतो. अनेक गाड्या १५ ते २० मिनिटांनी उशिरा धावतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com