मुंबई : रविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक | Mumbai Railway Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway megablock

मुंबई : रविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वेवर (central and harbor railway) रेल्वे रुळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा यांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी (railway repairing work) रविवारी, (ता. 14) रोजी मेगाब्लॉक (Mega block on Sunday) घेण्यात येईल. हार्बर मार्गावरील प्रवाशांना (commuters) सकाळी 10 ते सायंकाळी 4.30 पर्यंत मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गिकेवरून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा: राज्य नाट्य स्पर्धा डिसेंबरपासून सुरू होणार; अमित देशमुख यांची घोषणा

कुठे : सीएसएमटी-विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅकदरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील डाऊन दिशेकडे जाणाऱ्या लोकल विद्याविहारपर्यंत डाऊन जलद मार्गावर चालविण्यात येईल. ही गाडी भायखळा, परळ, दादर, माटुुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकावर थांबेल. तर, घाटकोपर येथून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या अप धीम्या लोकल विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकादरम्यान थांबणार नाहीत.

कुठे : कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर

कधी : सकाळी 11.10 ते दुपारी 4.10

परिणाम : ब्लाॅकदरम्यान सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येईल. सीएसएमटी- कुर्ला आणि पनवेल-वाशी मार्गावर विशेष लोकल सेवा चालविण्यात येतील.

loading image
go to top