Mumbai : ऐनवेळी लोकलच्या वेळा बदलल्यामुळे प्रवाशांना करावा लागला गर्दीचा सामना

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्य शुक्रवारी बाबासाहेबाना अभिवादन करण्यासाठी मुंबई आणि उपनगरातून मोठ्या संख्येने नागरिक चैत्यभूमीवर आणि राजगृह (हिंदू कॉलनी) आले होते.
Mumbai Local
Mumbai LocalSakal

मुंबई - नुकत्याच झालेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीला पूर्ण क्षमतेने लोकल धावलेल्या नव्हत्या. त्यामुळे आंबडेकरी अनुयायांना आणि प्रवाशांना दिवसभर प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला होता.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्य शुक्रवारी बाबासाहेबाना अभिवादन करण्यासाठी मुंबई आणि उपनगरातून मोठ्या संख्येने नागरिक चैत्यभूमीवर आणि राजगृह (हिंदू कॉलनी) आले होते.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांना लोकलचा गर्दीचा सामना करावा लागला होता. इतकेच नव्हेतर काय कोपर ते ठाकुर्ली आणि टिटवाळा ते खडवलीदरम्यान अभियांत्रिकी कामे हाती घेण्यात आल्याने शुक्रवारी कर्जत व कसारा मार्गावरील रात्रीच्या अखेरच्या लोकलचे वेळा बदलण्यात आल्या.

Mumbai Local
Old Mumbai Pune Highway Acident: बोरघाटाच्या अपघातातील जखमींची नावे जाहीर, झांज पथकातील वादकांचा होता समावेश

यामुळे रात्री सीएसएमटीहून रात्री ११.५१ वाजता अंबरनाथसाठी अखेरची लोकल सुटली तर कर्जतपर्यंत धावणारी अखेरची लोकल रात्री ११.३० वाजता सुटली. कसारा मार्गावरील अखेरची लोकल १०.५० वाजता सुटली. त्यामुळे चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांना घर गाठण्यासाठी कसरत करावी लागली.

Mumbai Local
Old Mumbai Pune Highway Acident: बोरघाटाच्या अपघातातील जखमींची नावे जाहीर, झांज पथकातील वादकांचा होता समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com