Mumbai Rain : मुंबईकरांची चिंता वाढली! तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस नाहीच

rain updates mumbai
rain updates mumbaiesakal

मुंबई - मुंबईत अजूनही पावसाला जोर धरलेला नाही. तलावात पाण्याचा साठा म्हणाला तसा वाढलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. यंदा पाऊस लांबल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सातही तलावांत केवळ 242861 दशलक्ष लिटर म्हणजे केवळ 16.28 टक्के पाणी शिल्लक आहे. समाधानकारण पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. मुंबईच्या उपनगरात आज अधूनमधून सरीसरीनी पाऊस पडला.

rain updates mumbai
Mumbai : 'बकरी ईद'निमित्त देवनार पशुवधगृहात १ लाख ६८ हजार शेळ्या मेंढ्यांची विक्री

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. जुलै महिना सुरू झाला असला तरी तलाव क्षेत्रात पुरेसा पाऊस अद्याप सुरू नाही. पाऊस सरीसरीनी पडत आहे. त्यामुळे साठा वाढत नाही. तलावांच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही म्हणाला तसा पाऊस पडत नाही.

rain updates mumbai
NCP Crisis: राष्ट्रवादीच्या आणखी दोन नेत्याची हाकालपट्टी; अजित पवारांसोबत गेल्यानं कारवाई

मुंबई शहरात आजही सकाळपासून पाऊस सुरू होता. सरीसरीनी सुरू असलेल्या पावसाने दुपारनंतर उसंत घेतली. दुपारनंतर ऊन पडले. उकाडा वाढला होता. मुंबई शहरातही पाऊस गेल्या काही दिवस सुरू आहे. मुंबईत पाऊस सरीसरीनी पडू लागला आहे. पावसाने दैना उडाली. रस्ते जलमय झाले. सखल भागात पाणी भरले. मात्र समाधानकारक पाऊस पडलेला नाही.

सध्याचा जलसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

मोडक सागर 56637 (43.85 टक्के)

तानसा 58151 (40.08 टक्के)

मध्य वैतरणा 47256 (24.42 टक्के)

भातसा 66348 (9.25 टक्के)

विहार 10524 (38.00 टक्के)

तुळशी 4045 (50.57 टक्के)

तीन वर्षांतील स्थिती

२०२३ 242861 दशलक्ष लिटर

२०२२ 186973 दशलक्ष लिटर

२०२१ 286830 दशलक्ष लिटर

आजचा पाऊस

शहर - 31 मिलीमिटर

पूर्व उपनगर - 45 मिलिमिटर

पश्चिम उपनगर - 61 मिलिमिटर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com