School Closed in Mumbai: मुंबई अन् उपनगरातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; IMDचा अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत अतिमुसळधार पावसामध्ये बस चालवणार नाही, असा निर्णय मुंबई स्कुल बस असोसिएशनने घेतला आहे.
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update

Mumbai Rain Update:सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. भारताच्या काही भागांमध्ये पावसाने रुद्रावतार धारण केलाय, तर काही ठिकाणी पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीवर देखील मुसळधार पावसाने चांगलाच हैदोस घातला आहे. अशातच, हवामान विभागाने मुंबईमध्ये पुढील काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला.

अशा परिस्थितीत या अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये, असा मानस प्रशासनाचा आहे. त्या अनुषंगाने मुंबई आणि मुंबई उपनगरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुटी जाहीर केली आहे.

तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

स्कुल बस असोसिएशनचा निर्णय

मुंबईतील अतिमुसळधार पावसात स्कुल बस न चालवण्याचा निर्णय मुंबईच्या स्कुलबस असोसिएशनने घेतला आहे. याबद्दल त्यांनी पालकांना पुर्वसुचना देखील दिल्या आहेत.

महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर

मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केल्यानंतर आता महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबद्दल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com