
प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसह राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला.
मुंबई: मुंबईत काल रात्री 8 च्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर वाढून काही मुंबईसह ठाणे,नवी मुंबई आणि रायगड मधील काही भागात पाऊस बरसला.
प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसह राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला. त्यानुसार आज विदर्भ, आसपासच्चा परिसर आणि दक्षिण तसेच मध्य महाराष्ट्रात चक्रीवादळ येऊन धडकले. समुद्रसपाटीपासून 0.9 उंचीवर असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
केरळ, कर्नाटक मधून प्रवास करत चक्रीवादळ सध्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात असून ते उत्तर केरळ किनाऱ्यापासून चक्रीय परिभ्रमण करत कर्नाटक राज्य ओलांडून ते दक्षिण मध्य महाराष्ट्रातर दाखल झाले आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि कोकण आणि गोवा यासह उत्तराखंड, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी विजेच्या गडगडाटासह गारांचा पाऊस पडला.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
विलेपार्ले, मालाड येथे पाऊस झाला. या भागात 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ पाऊस बरसला. तर पनवेल खारघर परिसरातही पाऊस झाला. नवी मुंबईतदेखील मुसळधार पाऊस झाला.
मुंबई उपनगरांमधील नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह अंबरनाथमध्येही मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या पिकाबरोबरच अनेक जिल्ह्यांमधील शेतमालाचं मोठं नुकसान झालं आहे.
---------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Mumbai Rain Updates Thane and Navi Mumbai thunderstorms with lightning