esakal | Mumbai Rain: तुंबलेल्या पाण्यातून रितेश घरातील सामान आणायला गेला अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

water Logging

Mumbai Rain: तुंबलेल्या पाण्यातून रितेश घरातील सामान आणायला गेला अन्...

sakal_logo
By
नरेश शेंडे

मुंबई: मुंबईत शनिवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळं (Heavy Rainfall) जनजीवन विस्कळीत झाले आहे. अस्मानी संकटामुळं अनेकांचे कुटुंब उध्वस्त (Family Death) झाले आहेत. काळरात्र बनून पडलेल्या पावसामुळं आतापर्यंत ३० पेक्षा जास्त नागिरकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत अजूनही पावसाची संततधार (Mumbai Rain) सुरुच आहे. कांदिवलीत (Kandivali) एका २१ वर्षीय तरुणाचा विजेता शॅाक लागून मृत्यू झाला आहे. रितेश झा असं या तरूणाचं नाव आहे. टाइम्स ऑफ इंडियात हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. (Mumbai Rainfall Ritesh Jha Death due to Electrical Shock in water lodging-nss91)

हेही वाचा: पावसाळी अपघातांचे झोपड्यांमधील बळी हे शिवसेनेचे पाप, प्रसाद लाडांचा घणाघात

रितेश त्याच्या कुटुंबासह बिहार टेकडी येथे राहायचा. शनिवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळं या परिसरात पाणी सहा ते आठ फूटापर्यंत तुंबले होते. त्यामुळे पाण्यात अडकलेले घरातील सामान योग्य ठिकाणी नेण्याचे रितेशने ठरवले. रात्री दोन ते तीन वाजताच्या दरम्यान रितेश सामान घेवून घराच्या बाहेर आला. त्यानंतर गली नाक्यावर पोहोचल्यावर पाण्यात पसरलेल्या विद्यूत प्रवाहाचा रितेशला शॅाक लागला. त्यानंतर लगेचच रितेशला त्याच्या कुटुंबीयांनी पाण्याच्या बाहेर काढले. त्याला सुरभी रुग्णालयात नेले. पण तेथील डॅाक्टरांनी डॅा. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात पुढील उपचारासाठी रितेशला दाखल करण्यासाठी सांगितले. मात्र प्रवासादरम्यान रितेशचा मृत्यू झाला. रितेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

loading image