esakal | मुंबईत 'रेड अलर्ट'; चेंबूर, सायनमध्ये पाणी साठायला सुरूवात
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत 'रेड अलर्ट'; चेंबूर, सायनमध्ये पाणी साठायला सुरूवात

मुंबईत 'रेड अलर्ट'; चेंबूर, सायनमध्ये पाणी साठायला सुरूवात

sakal_logo
By
विराज भागवत

मरिन ड्राईव्हवर समुद्रात मोठमोठ्या लाटा, पाहा Video

मुंबई: शहरात शनिवारपासून पावसाने जोर पकडला आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पावसाने मुंबईला झोडपले. शनिवारी तर काळरात्र बननू पाऊस कोसळला. त्यावेळी मुंबईत विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये ३० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला. कालच्या दिवस पावसाने थोडीशी विश्रांती घेतली होती. पण आज सकाळपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. त्यामुळे, मुंबईतील अनेक सखळ ठिकाठिकाणी पाणी साचण्यास सुरूवात झाली. त्यामुळे मुंबईत उद्या पर्यंत रेड अलर्ट जाहीर केला असून उद्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच, काही भागात अति मुसळधार पावसाचीही शक्यता व्यक्त केली आहे. (Mumbai Rains Red Alert Weather Forecast Marine Drive Waterlogging Chembur Sion Hindmata See Videos)

हेही वाचा: ठाणे: "लेडीज बार तुडुंब भरून कोणाच्या आशीर्वादाने सुरू होते?"

चेंबूर, सायन आणि त्यासारख्या सखल परिसरात सकाळी फार पाणी साचलं नव्हतं पण पावसाचा जोर वाढल्यानंतर दुपारच्या सुमारास पाणी भरायला सुरूवात झाली. नेहमीप्रमाणे अनेक सखल भागात पाणी साचले. दादरच्या हिंदमाता परिसरापासून ते चेंबूरच्या काही ठराविक भागांपर्यंत सर्वत्र दुपारनंतर पाणी तुंबायला सुरूवात झाली. चेंबूर परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा होत असल्याचा व्हिडीओ एएनआय वृत्तसंस्थेने पोस्ट केला आहे. तसेच, सायन परिसरातही पावसाचा जोर वाढल्याचा एक छोटा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. त्यामुळे आता पावसाचा जोर असाच राहिला तर मुंबईची पुन्हा तुंबई होणार अशी भिती व्यक्त होत आहे. तसेच, मरिन ड्राईव्हवर सुद्धा पावसामुळे लाटा जोरजोरात उसळताना दिसत आहेत.

मरिन ड्राईव्हचा व्हिडीओ-

चेंबूरचा व्हिडीओ-

सायनचा व्हिडीओ-

दरम्यान, आज सकाळी ९ वाजून ५२ मिनिटांनी भरतीची वेळ होती. ४. १२ मीटर उंचीच्या लाटा मुंबईला धडकल्या. रात्री ९ वाजून ३५ मिनिटांनी पुन्हा भरतीची वेळ असणार आहे. त्यावेळी ३. ६३ मीटर उंचीच्या लाटा उसळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

loading image