
Stop the Fix: Raj Thackeray Demands Voter List Overhaul Before Elections
Sakal
मुंबई : राज्यात ९६ लाख खोट्या मतदारांची नोंद झाल्याचा खळबळजनक दावा करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. ही स्थिती लोकशाहीसाठी लज्जास्पद आहे. निवडणुकांमध्ये ‘मॅच फिक्सिंग’ सुरू आहे. त्याचवेळी, मतदार यादीत जोपर्यंत सुधारणा होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा, असा इशाराच ठाकरे यांनी यानिमित्ताने दिला.