Mumbai Crime : कुरिअर कुठे पोहोचलं हे बघायला फोन केला अन् झटक्यात बँक अकाऊंट रिकामं झालं!

सायबर चोरट्यांनी चोरीची ही नवी पद्धत आता शोधून काढली आहे.
Courier Service Pune
Courier Service PuneSakal
Updated on

मुंबईतल्या विलेपार्ले इथल्या एका रहिवाशाने आपली ऑर्डर कुठपर्यंत आली हे तपासायला फोन केला अन् झटक्यात एक लाख रुपये गमावले. सायबर चोरट्यांनी चोरीची ही नवी पद्धत सुरू केली असल्याचं आढळून आलं आहे. कुरिअर कंपन्यांचे नंबर बदलून स्वतःचे नंबर तिथे टाकल्याचा प्रकार घडत आहे.

हे चोरटे आपण कुरिअर कंपनीचे प्रतिनिधी आहोत, असं भासवतात. पीडितांना एक अॅप डाउनलोड करायला सांगतात आणि त्यांची फसवणूक करतात. ५५ वर्षीय संतोष मुरकुटे याने ८ फेब्रुवारीला काही कामानिमित्त एक छोटे मशीन गुजरातला पाठवले होते. जेव्हा त्याच्या क्लायंटने सांगितले की त्यांना कुरिअर मिळाले नाही, तेव्हा 10 फेब्रुवारी रोजी त्याने वापरलेल्या एअर कुरिअर सेवेचा नंबर शोधला.

Courier Service Pune
Pune Crime : महिलेला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पुणे शहर उपाध्यक्षाला अटक

त्याने ऑनलाइन सापडलेल्या नंबरवर कॉल केला. फोनच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या व्यक्तीने मुरकुटे यांना सांगितले की, कुरिअर कुठे आहे हे तपासण्यासाठी त्यांना अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर त्याला दुसऱ्या व्हॉट्सअॅप नंबरवरून लिंक मिळाली आणि त्याने दिलेल्या सूचनांनुसार अॅप डाउनलोड केले.

त्यानंतर कॉलरने मुरकुटे यांना २ रुपयांचा व्यवहार करण्यास सांगितले आणि त्यानंतर ते त्यांच्या विनंतीनुसार पुढे जातील, असंही सांगितलं. त्याने व्यवहार केला आणि नंतर त्याला सांगण्यात आले की पार्सल ज्या ठिकाणी पोहोचले आहे त्याबद्दल त्याला लवकरच अपडेट केले जाईल. मात्र, पुढील दोन दिवसांत त्याच्या खात्यातून एकूण ९९,५९९ रुपयांचे अनेक व्यवहार झाले.

रविवारीच मुरकुटे यांना त्यांच्या खात्यातून पैसे डेबिट झाल्याची माहिती मिळाली. त्याने ‘कुरिअर कंपनी’च्या नंबरवर कॉल केला असता, तो नंबर बंद असल्याचे आढळले. आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले, त्यानंतर त्याने विलेपार्ले पोलिस ठाण्यात संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com